शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
2
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
3
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
4
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
5
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
6
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
7
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
8
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
9
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
10
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
11
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
12
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
13
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
14
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!
15
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
16
रोकड, सोनंनाणं आणि..., निवृत्त अबकारी अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड    
17
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला धन्वंतरीची आणि लक्ष्मीची पुजा करण्यामागे आहे पौराणिक कारण!
18
बाजारात 'सुपर वेन्सडे'! सेन्सेक्स ८२,६०० पार; गुंतवणूकदारांनी एकाच दिवसात कमावले ४.२९ लाख कोटी
19
'या' कंपनीवर लागला बॅन, शेअर्स आपटले; बोनस शेअर्स देणं आणि शेअर्स स्प्लिटवरही बंदी, कोणता आहे स्टॉक?
20
Mumbai Crime: सफाई करताना दरोडेखोर घुसले; दागिने वाचवणाऱ्या दुकानमालकावर केले वार, घाटकोपरमध्ये ज्वेलर्सला लुटले

...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित

By बाळकृष्ण परब | Updated: May 4, 2024 10:12 IST

Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: काँग्रेसने राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना अमेठीऐवजी रायबरेलीतून उमेदवारी जाहीर करण्यामागची अनेक कारणं समोर येत आहेत. त्यामधील महत्त्वाचं कारण  आहे ते म्हणजे या दोन्ही मतदारसंघातील राजकीय आणि मतांचं गणित. 

- बाळकृष्ण परबअनेक दिवस संभ्रवाचं वातावरण आणि राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवून झाल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची उत्तर प्रदेशमधील रायबरेली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली. मात्र राहुल गांधी हे उत्तर प्रदेशमधील अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवतील, असे संकेत मिळत असताना पक्षाने त्यांना रायबरेली मतदारसंघातून उमेदवारी दिली गेल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, काँग्रेसने राहुल गांधी यांना अमेठीऐवजी रायबरेलीतून उमेदवारी जाहीर करण्यामागची अनेक कारणं समोर येत आहेत. त्यामधील महत्त्वाचं कारण  आहे ते म्हणजे या दोन्ही मतदारसंघातील राजकीय आणि मतांचं गणित. 

अमेठी हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला राहिला आहे. मात्र २०१४ नंतर बदलेल्या राजकीय परिस्थितीत येथील काँग्रेसचा येथील जनाधार आक्रसत गेलाय.  येथील मागच्या दहा वर्षांतील आकडेवारीवर नजर टाकल्यास २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना कडवी टक्कर दिली होती. मात्र त्यावेळी राहुल गांधी यांनी १ लाख ७ हजार ९०३ मतांनी विजय मिळवला होता. मात्र राहुल गांधी यांच्या मताधिक्यामध्ये कमालीची घट झाली होती. पण २०१९ मध्ये स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना पराभवाचा धक्का देताना ५५ हजार १२० मतांनी सनसनाटी विजयाची नोंद केली होती.

अमेठीमधील सध्याचं राजकीय गणित पाहिल्यास सद्यस्थितीत अमेठी लोकसभा  मतदारसंघातील पाच विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा एकही आमदार नाही. येथे भाजपाचे तीन आणि समाजवादी पक्षाचे २ आमदार आहेत. २०२२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मदारसंघात मिळून भाजपाला ४ लाख १८ हजार ७०० एवढी मतं मिळाली होती. तर त्याखालोखाल समाजवादी पक्षाला ३ लाख ५२ हजार ४७५, तर तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या काँग्रेसला १ लाख ४२ हजार ९५२ एवढी मतं मिळाली होती. तर बसपाला केवळ ४५ हजार ७२७ एवढं मतदान झालं. एकूणच काँग्रेस पक्षाला येथे विजय मिळवण्यासाठी समाजवादी पक्षाच्या सहकार्यावर विसंबून राहावं लागलं असतं. 

दुसरीकडे रायबरेली मतदारसंघात मात्र काँग्रेससाठी काहीशी अनुकूल परिस्थिती आहे.  १९७७, १९९६ आणि १९९८ या तीन निवडणुकांचा अपवाद वगळता येथे काँग्रेसला सातत्याने यश मिळालेले आहे. सोनिया गांधी यांनी २००४ ते २०१९ अशा सलग ५ निवडणुकांत येथून विजय मिळवलेला आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये मोदीलाटेमध्येही सोनिया गांधी यांनी मोठ्या मताधिक्याने येथून विजय मिळवला होता. पण २०१९ मध्ये सोनिया गांधी यांच्या मताधिक्यात मोठी घट होऊन ते १ लाख ६७ हजारांपर्यंत खाली आले होते. या मतदारसंघातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहिल्यास येथील पाच विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचा एकही विद्यमान आमदार नाही आहे. येथे समाजवादी पार्टीचे ४ तर भाजपाचा एक आमदार आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत या लोकसभा क्षेत्रात झालेल्या मतदानाचा आढावा घेतल्यास इथे समाजवादी पक्षाला ४ लाख २ हजार २७९  मतं मिळाली होती. तर भाजपाला ३ लाख १८ हजार ६९० एवढं मतदान झालं होतं. रायबरेलीमध्येही विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता. येथे काँग्रेसला १ लाख ४० हजार ७०६ मतं मिळाली होती. तर बहुजन समाज पक्षालाही एकूण १ लाख ३ हजार २४३ एवढं मतदान झालं होतं. एकंदरीत रायबरेलीमध्येही काँग्रेस आणि राहुल गांधी यांची मदार ही अखिलेश यादव यांच्याकडून होणाऱ्या सहकार्यावर असणार आहे. मात्र समाजवादी पक्ष हा इंडिया आघाडीत असून, उत्तर प्रदेशमध्येही काँग्रेस आणि सपा एकत्रित निवडणूक लढवत आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्यासाठी ही लढाई काहीशी सोपी असेल. 

रायबरेलीमधून राहुल गांधींसमोर भाजपाच्या दिनेश प्रताप सिंह यांचं मुख्य आव्हान असेल. तर बसपाने ठाकूर प्रसाद यादव यांना उमेदवारी देऊन ही लढत तिरंगी केली आहे. त्यामुळे बसपाच्या उमेदवाराने काही प्रमाणात मतविभाजन घडवून आणल्यास त्याचा फटका राहुल गांधी यांना काही प्रमाणात बसू शकतो. पण गांधी कुटुंबीयांबाबत येथील मतदारांमध्ये असलेला आपलेपणा. सोनिया गांधी यांनी २००४ पासून येथे राखलेलं वर्चस्व आणि  समाजवादी पक्षाचा भक्कम पाठिंबा असल्याने रायबरेलीमधील निवडणूक तितकीशी अवघड जाणारा नाही. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीrae-bareli-pcरायबरेलीamethi-pcअमेठीUttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४