शहरं
Join us  
Trending Stories
1
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
2
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
3
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
4
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
5
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
6
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
7
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
8
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
9
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
10
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
11
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
12
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
13
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
14
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
15
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
16
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
17
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
18
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतक झळकावणाऱ्या टॉप ५ महिला क्रिकेटपटू!
19
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
20
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल

अनुप्रिया पटेल, रामदास आठवलेंच्या राज भैयांवरील वक्तव्यांनी यूपीमध्ये भाजपाचं गणित बिघडवलं, होणार मोठं नुकसान? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 18:02 IST

Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: अनुप्रिया पटेल आणि रामदास आठवले यांनी कुंडा येथील आमदार राजा भैया यांच्याबाबत केलेल्या विधानांमुळे भाजपासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

भाजपासाठी लोकसभेमध्ये बहुमत मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये अद्याप २७ मतदारसंघातील मतदान बाकी आहे. अशा परिस्थिती २०१४ मधील कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपाला या २७ जागा महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे भाजपाचे वरिष्ठ नेते एनडीएच्या बाहेर असलेल्या नेत्यांसोबतही चर्चा करून समिकरणं जुळवण्याचा प्रयत्न आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भाजपाकडून कुंडा येथील आमदार आणि जनसत्ता दल लोकतांत्रिकचे प्रमुख राजा भैय्या यांना आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र अनुप्रिया पटेल आणि रामदास आठवले यांनी केलेल्या विधानांमुळे भाजपासमोरील अडचणी वाढल्या आहेत. उत्तर प्रदेशमधील ज्या २७ मतदारसंघातील मतदान बाकी आहे, त्या मतदारसंघांमध्ये क्षत्रिय मतदारांचं प्रमाण अधिक आहे. विशेषकरून प्रतापगड आणि जौनपूर या ठिकाणी ठाकूर मतदार निर्णायक भूमिकेत असतील, अशा परिस्थितीत अनुप्रिया पटेल आणि रामदास आठवलेंच्या विधानामुळे भाजपाने जुळवलेला खेळ बिघडल्याचे बोबले जात आहेत.

त्याचं झालं असं की, काही दिवसांपूर्वी कौशांबी येथे प्रचाररादम्यान, अपना दलच्या अध्यक्षा आणि केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनी राजा भैया यांचं नाव न घेता त्यांच्यावर जोरदार आरोप केले होते. लोकशाहीमध्ये राजा, राणी  पोटातून जन्माला येत नाही. तर आता राजा ईव्हीएमच्या बटणातून जन्माला येतो. स्वयंघोषित राजांना वाटतं की कुंडा ही त्यांची जहागीर आहे. त्यांचा भ्रम मोडून काढण्याची ही तुमच्याकडे सुवर्णसंधी आहे, असं विधान अनुप्रिया पटेल यांनी केलं होतं.

दरम्यान, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वाराणसीमध्ये बोलताना अनुप्रिया पटेल यांचं विधान योग्य असल्याचे म्हटले आहे. रामदास आठवले म्हणाले की, राजा भैय्याची पार्श्वभूमी संपूर्ण उत्तर प्रदेशला माहिती आहे. काही गुंड लोकांना मतंही मिळतात. लोकांना घाबरवून दिशाभूल करून मतं मिळवतात. असे लोक निवडूनही येतात. मात्र मतं मिळाल्याने कुणी राजा बनू शकत नाही. तो केवळ नाामधारी राजा असू शकतो, अनुप्रिया पटेल जे काही बोलल्या आहेत, ते योग्य बोलल्या आहेत.

दरम्यान, या सर्वावर पलटवार करताना राजा भैया म्हणाले होते की, आता राजा किंवा राणी जन्माला येणं बंद झालं आहे. ईव्हीएममधून राजा जन्माला येत नाही तर जनसेवक जन्माला येतो. जनतेचा प्रतिनिधी जन्माला येतो. तसेच जर ईव्हीएममधून जन्माला जेणारे स्वत:ला राजा म्हणू लागले तर लोकशाहीच्या मूळ भावनेचा पराभव होईल. जनता त्यांची सेवा करण्यासाठी, त्या भागाचा विकास करण्यासाठी ईव्हीएमचं बटण दाबून तुम्हाला ही संधी देते. राजेशाही तर कधीच संपली आहे. काही कुंठीत लोक अशा प्रकारची विधानं करतात, असा टोला राजा भैया यांनी लगावला.  

टॅग्स :Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४pratapgarh-pcप्रतापगढRamdas Athawaleरामदास आठवलेBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४