शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

प्रश्नपत्रिका फोडल्यास आजन्म कारावास; एक कोटी रुपयांपर्यंतचा दंड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 09:28 IST

उत्तर प्रदेशात योगी सरकारचा निर्णय; परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी अध्यादेश जारी; भरती, पदवी-डिप्लोमा यांच्यासह सर्व प्रवेश परीक्षांसाठीही नियम लागू

राजेंद्र कुमार

लोकमत न्यूज नेटवर्क, लखनौ : स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका फोडणे व अन्य गैरप्रकार रोखण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने कडक कायदा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अशा प्रकरणांतील आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा तसेच एक कोटी रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येईल, यासंदर्भातील अध्यादेशाला गुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी मंजुरी देण्यात आली. या अध्यादेशाला राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी मंजुरी देताच उत्तर प्रदेश सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध अध्यादेश २०२४चे कायद्यात रूपांतर होईल.

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री बृजेश पाठक यांनी दावा केला आहे की, या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतर उत्तर प्रदेशात स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फोडण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही. स्पर्धा परीक्षांमध्ये होणारी फसवणूक न रोखता आल्याबद्दल लोकसभा निवडणुकांत उत्तर प्रदेशमध्ये विरोधकांनी भाजपवर कडक टीका केली होती. त्या राज्यातील प्रचारात तो प्रमुख मुद्दा बनला होता, उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकांच्या आधी पोलिस भरतीसाठी झालेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली होती. त्याचा फटका ५० लाखांहून अधिक परीक्षार्थींना बसला होता. त्या राज्याच्या लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या समीक्षा अधिकारी/सहायक समीक्षा अधिकारी पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिकाही फुटली होती. त्या मुद्दधावरून विरोधकांनी योगी आदित्यनाथ सरकारला कोंडीत पकडले होते. 

दिले होते संकेत...- स्पर्धा परीक्षांतील गैरप्रकार रोखण्यासाठी कडक कायदा करण्याचे संकेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले होते. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्या- साठीच्या अध्यादेशाला मंगळवारी उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. - सध्या विधानसभा अधिवेशन नसल्यामुळे अध्यादेश जारी करण्यात आला आहे. असे उपमुख्यमंत्री बृजेश पाठक यांनी सांगितले. भरतीसाठी होणाऱ्याा, पदवी-डिप्लोमासाठी होणाऱ्या तसेच अन्य प्रकारच्या शैक्षणिक प्रवेश परीक्षांसाठीही हा अध्यादेश लागू होईल.

बनावट वेबसाइट तयार करणे हाही ठरविला गुन्हाबनावट प्रश्नपत्रिका वितरित करणे, भरतीसाठी बनावट वेबसाइट बनविणे हा उत्तर प्रदेशने बनविणार असलेल्या परीक्षाविषयक कायद्यात गुन्हा ठरविण्यात आला आहे, प्रश्नपत्रिका प्फोडण्यासारख्या गोष्टींमुळे परीक्षेयर होणारा परिणाम दूर करण्यासाठी होणारा खर्च आरोपीकडून वसूल करण्याचे या कायद्याद्वारे ठरविण्यात आले आहे, परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या कंपन्या किंवा सेवा पुरविणायांना कायमचे काव्यायादीत टाकले जाणार आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशEducation Sectorशिक्षण क्षेत्रyogi adityanathयोगी आदित्यनाथ