शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशात आणखी एक एन्काउंटर! 1 लाखाचे बक्षीस असलेला गुन्हेगार ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 09:58 IST

Kaushambi Encounter : चकमकीच्या ठिकाणाहून एक ९ एमएम कार्बाइन, एक पिस्तूल आणि एक अपाचे बाईक जप्त करण्यात आली आहे.

लखनौ : उत्तर प्रदेशात पोलिसांनी आणखी एक एन्काउंटर केला आहे. याठिकाणी पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (UP STF) १.२५ लाख रुपयांचे बक्षीस असलेला गुन्हेगार गुफरानला एन्काउंटरमध्ये ठार केले. गुन्हेगार गुफरानवर १३ गुन्हे दाखल आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कौशांबी जिल्ह्यातील सामदा भागात मंगळवारी पहाटे ५ वाजता पोलिस आणि गुफरान यांच्यात चकमक झाली. यावेळी एसटीएफच्या पथकाने चकमकीत गुन्हेगार गुफरानला ठार केले.

दरम्यान, चकमकीच्या ठिकाणाहून एक ९ एमएम कार्बाइन, एक पिस्तूल आणि एक अपाचे बाईक जप्त करण्यात आली आहे. गुफरान याच्यावर खून, दरोडा, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, एडीजी प्रयागराज यांनी गुफरानवर एक लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. दुसरीकडे, सुलतानपूर पोलिसांनी गुफरानवर २५ हजारांचे बक्षीस ठेवले होते. 

प्रतापगड आणि सुलतानपूर जिल्ह्यात गुफरानवर १३ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वी एप्रिलमध्ये प्रतापगडमध्ये एका ज्वेलर्सच्या दुकानात गोळीबार करत मोठा दरोडा टाकण्यात आला होता. या दरोड्याच्या घटनेत गुफरानचा समावेश होता, असे असल्याचे सांगण्यात येत आहे.

योगी सरकारच्या काळात सर्वाधिक एन्काउंटर योगी आदित्यनाथ २०१७ साली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले, तेव्हापासून उत्तर प्रदेश पोलिसांनी राज्याच्या विविध शहरांमध्ये अनेक एन्काउंटर केले आहेत. उत्तर प्रदेशातील मेरठ आणि आग्रा या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त एन्काउंटर्स करण्यात आले आहेत. त्यानंतर प्रयागराज, कानपूर आणि लखनौ जिल्ह्यात पोलिसांनी एन्काऊंटर केले आहेत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी