शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सख्या बहिणींचं शेजारील गावच्या सख्ख्या भावांशी लग्न; सासरी पोहचताच नववधू दागिने घेऊन फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 14:11 IST

दोन सख्या बहिणींनी दोन सख्ख्या भावांशी विवाह करून त्यांचा काटा काढल्याची अनोखी घटना समोर आली आहे.

हरदोई : दोन सख्या बहिणींनी दोन सख्ख्या भावांशी विवाह करून त्यांचा काटा काढल्याची अनोखी घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. इथे दोन बहिणींनी कट रचून सख्ख्या भावांना खीरमध्ये मादक पदार्थ मिसळून खायला दिले. यानंतर मौल्यवान वस्तू घेऊन दोघीही फरार झाल्या. एका दलालाने दोन सख्ख्या भावांचे या मुलींशी लग्न लावले होते, ज्यासाठी त्याने ८० हजार आकारले. 

लग्न जुळवण्यासाठी दलालाने संबंधित दोन भावांकडून मोठी रक्कम घेतली. पैसे मिळाल्यानंतर दलालाने एका मंदिरात लग्न लावून दिले. रितीरिवाजानुसार दोन्ही वधू सासरी पोहचल्या आणि पतींना खीर बनवून दिली. खीरमध्ये त्यांनी मादक पदार्थ मिसळून प्यायला दिले. मग दुसऱ्या दिवशी दोघेही भाऊ झोपेतून उठले तर या बहिणींनी घरातील मौल्यवान वस्तू आणि पैसे घेऊन पळ काढला होता. याप्रकरणी संबंधितांनी स्थानिक पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 

नववधू दागिने घेऊन फरार प्रदीप पाल (३०) आणि कुलदीप पाल (२७) अशी दोन सख्ख्या भावांची नावे आहेत. त्यांची आई अंध आहे. आपल्या मुलांचे लग्न होत नसल्याने कुटुंबीय त्रस्त होते. मग त्यांनी दलालाचा आधार घेत ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला, जे त्यांच्या चांगलेच अंगलट आले. प्रदीप दिल्लीत एका खासगी कंपनीत काम करतो, तर कुलदीप गावीच असतो. दलालाने दोन सख्या बहिणींचे फोटो पाठवले. पाल कुटुंबीयांना देखील मुली पसंत पडल्या आणि त्यांनी लग्नासाठी होकार कळवला. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार वधूंसाठी सुमारे एक लाख रुपयांचे दागिने बनवले होते. ठरल्याप्रमाणे २२ नोव्हेंबर रोजी एका मंदिरात हा विवाहसोहळा पार पडला. 

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिरात लग्न लागल्यानंतर दोन्हीही वधू आणि वर घरी आले. घरी आल्यानंतर नववधूंनी घरच्यांसाठी खीर बनवली. खीर खाल्यानंतर सर्वांना सुस्ती आली आणि सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा नववधूंनी लग्नाचे दागिने, रोख रक्कम आणि घरातील मौल्यवान वस्तू चोरून नेल्या होत्या. यानंतर दरोडेखोर नववधूंविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून, सखोल तपास केल्यानंतर आरोपींना अटक करून तुरुंगात पाठवण्यात येईल. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्न