शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
5
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
6
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
7
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
8
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
9
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
10
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
11
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
12
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
13
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
14
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
15
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
16
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
17
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
18
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
19
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
20
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

ऐकावं ते नवलच! ड्युटी संपली म्हणून मोटरमनने रेल्वे उभी करून केला आराम; ४ तास प्रवाशांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 19:48 IST

उत्तर प्रदेशातील बाराबकी जिल्ह्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे.

बाराबकी : हे सोशल मीडियाचं जग आहे, इथे कोणती गोष्ट कधी व्हायरल होईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. अशीच एक अनोखी घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली. उत्तर प्रदेशातील बाराबकी जिल्ह्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. इथे ड्युटी संपली म्हणून दोन रेल्वे गाड्यांचे मोटरमन गाडी मध्येच थांबवून आराम करण्यासाठी निघून गेले. खरं तर स्थानकापासून दूर असलेल्या या दोन्ही गाड्या चार तास एकाच जागी उभ्या होत्या. यातील एका मोटरमनला वाटले की, रेल्वे व्यवस्थापन काहीतरी मार्ग काढून गाड्या पाठवून देईल, मात्र दुसरा चालक पुढील प्रवासासाठी तयारच न झाल्याने एकच खळबळ माजली.

दोन रेल्वे गाड्या बराच वेळ जागीच उभ्या असल्याने इतर गाड्यांना देखील याचा फटका बसला. प्रवाशांनी आपला संताप व्यक्त करताना रेल्वे प्रशासनाला लक्ष्य केले. बाराबकी जिल्ह्यातील बुढवल रेल्वे स्थानकाजवळील या घटनेने अनेकांचे लक्ष वेधले. सहरसा एक्सप्रेस प्रवाशांना घेऊन दिल्लीला जात असताना हा प्रकार घडला. ही गाडी बुढवल रेल्वे स्थानकाजवळ पोहचताच मोटरमनने विश्रांतीसाठी पळ काढला. बराच वेळ गाडी एकाच जागी थांबल्याने प्रवाशांनी आक्रोश केला. प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर जाऊन चौकशी केली असता मोटरमनची ड्युटी संपल्याने गाडी थांबली असल्याचे सांगण्यात आले. 

चार तासांनंतर गाडी रवाना ड्युटी संपल्याने मोटरमन गाडी पुढे नेण्यास नकार देत होते, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.  रेल्वे  चालकाची ड्युटी संपल्यावर दुसरा चालक गाडी पुढे नेण्यासाठी पाठवायला हवा होता, मात्र रेल्वे विभागाच्या दुर्लक्षामुळे अनेक तास गाडी उभी राहिली, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. गाडी एकाच जागी थांबवल्याने प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. प्रकरण चिघळत असल्याचे पाहून रेल्वे प्रशासनाने लोको पायलटला बोलावून रेल्वेला अंतिम स्थानकापर्यंत अर्थात दिल्लीपर्यंत पोहचवले.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशrailwayरेल्वे