शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

बनावट मार्कशीट दाखवून ३१ वर्ष केली सरकारी नोकरी; रिटायर्ड होताच झाली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 20:54 IST

सरकारी खात्यातील कर्मचाऱ्याने बनावट गुणपत्रिका दाखवून ३१ वर्ष नोकरी केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

सरकारी खात्यातील कर्मचाऱ्याने बनावट गुणपत्रिका दाखवून ३१ वर्षे नोकरी केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात एका सरकारी खात्यात हा कर्मचारी कार्यरत होता. संबंधित कर्मचाऱ्याने बनावट कागदपत्रे दाखवून सरकारी नोकरीचा लाभ घेतला. बनावट मार्कशीटच्या आधारे हा कर्मचारी ३१ वर्षे वाहतूक विभागात कार्यरत होता. नोकरीतून निवृत्त झाल्यावर त्याने बनावट कागदपत्रे सादर केल्याचे उघड झाले. तब्बल ३१ वर्षे वाहतूक विभागात चालक म्हणून काम केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, दीपक टंडन नावाच्या व्यक्तीने सुधीर कुमार याच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल केला होता. न्यायालयाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुधीर कुमार ३१ ऑगस्ट २०२१ रोजी वाहतूक विभागातून निवृत्त झाला. न्यायालयाने कलम ४२०, ४६७, ४६८ आणि ४७१ अन्वये गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

ड्रायव्हिंग लायसन्सच्या अटी अन् पर्दाफाश तक्रारदार दीपक टंडन यांनी सांगितले की, सुधीर कुमार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो मुझफ्फरनगरमधील खतौली डेपोमध्ये चालक म्हणून कार्यरत होता, जो ३१ ऑगस्ट २०२१ रोजी सेवानिवृत्त झाला. तो बनावट कागदपत्रांवर एवढी वर्षे नोकरी करत होता. १९८९ मध्ये त्याने नोकरी करायला सुरूवात केली तेव्हाच त्याने ड्रायव्हिंग लायसन्सच्या अटी पूर्ण केल्या नव्हत्या. त्याची खरी जन्मतारीख १५ ऑगस्ट १९६५ ही आहे. तर, खोट्या कागदपत्रांमध्ये १५ ऑगस्ट १९६१ अशी दाखवण्यात आली आहे. 

दरम्यान, तक्रारदाराने सार्वजनिक माहितीच्या आधारे सिसौली येथील जनता इंटर कॉलेजमधून सुधीर कुमारचे शैक्षणिक रेकॉर्ड मिळवले. तेथील मुख्याध्यापकांनी सांगितले की, आरोपीची जन्मतारीख शाळेच्या रेकॉर्डमध्ये १५ ऑगस्ट १९६५ अशी आहे, याच शाळेत आरोपीने पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण घेतले होते. अशा प्रकारे तो बनावट गुणपत्रिकेच्या मदतीने सरकारी नोकरी करत होता.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशGovernmentसरकारjobनोकरी