शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 15:06 IST

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी दुपारी गोरखपूर येथील एनेक्सी भवनात जिल्ह्यात सुरू असलेल्या विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.

गोरखपूर -  प्रत्येक विकास प्रकल्प निर्धारित वेळेत आणि दर्जेदारपणे पूर्ण होतील हे निश्चित करा. प्रत्येक प्रकल्पासाठी एक नोडल अधिकारी नियुक्त करा, जो नियमितपणे कामावर लक्ष ठेवेल. जर कोणत्याही प्रकल्पात कंत्राटदाराचा निष्काळजीपणा आढळला तर त्याच्यावर कठोर कारवाई करा. जर कोणत्याही विकास प्रकल्पात काही त्रुटी आढळली, गुणवत्तेशी तडजोड केली गेली, तर संबंधितांवर कारवाई निश्चित आहे. एवढेच नाही, तर प्रत्येक प्रकल्पासाठी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल, अशा स्पष्ट सूचना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांनी रविवारी दुपारी गोरखपूर येथील एनेक्सी भवनात जिल्ह्यात सुरू असलेल्या विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.

गोरखपूरमध्ये सुरू असलेल्या विकास प्रकल्पांच्या अद्ययावत प्रगतीची माहिती घेत मुख्यमंत्री योगी म्हणाले, "विकास कामांमुळे संपूर्ण देशात गोरखपूरबद्दल एक सकारात्मक धारणा आहे. विकास कामांमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः संबंधित प्रकल्पाच्या नोडल अधिकाऱ्यांकडून विकास प्रकल्पाच्या प्रगतीची माहिती घ्यावी. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी पीएसी महिला बटालियन, खजानची बाजार, पदरी बाजार, बरगडवा, गोरखनाथ, पैडलेगंज-नौसढ उड्डाणपूल, तसेच भोपा बाजार ओव्हरब्रिजसह सर्व प्रमुख विकास प्रकल्पांना गती देण्याचे आणि बांधकामे निर्धारित वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

आजारांना रोखण्यासाठी मोहीम राबवली जाणार -आढावा बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले, कधी काळी पूर्वांचलसाठी शाप ठरलेल्या एन्सेफलायटीस (जेई आणि एईएस) नियंत्रित करण्यात आला आहे. मात्र, सातत्याने खबरदारी घेणे आवश्यक आहे. याचप्रमाणे डेंग्यू आणि इतर हंगामी आजार रोखण्यासाठी जनतेला जागरूक करावे लागेल. यासाठी लोकांमध्ये जागरूकता आणि स्वच्छतेशी संबंधित मोहिमा राबवाव्यात. जनजागृतीबाबत प्रचार वाढवावा. हे काम सर्व नगरपालिका संस्थांमध्ये केले जावे.

मेडिकल माफियांना आळा घाला - मुख्यमंत्री म्हणाले की, गोरखपूरसह संपूर्ण राज्यातील माफियां राज मोडून काढण्यात आले आहे. अनेक वेळा वैद्यकीय व्यवसायात रुग्णवाहिका माफियां अथवा रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याऱ्या मध्यस्थांच्या चालणाऱ्या खेळाच्या तक्रारी येतात. यावर सातत्याने कडक कारवाई होणे आवश्यक आहे. वैद्यकीय क्षेत्रात कुणीही माफियांचा राहणार नाही अशी कारवाई करा.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्त्यावरील विक्रेत्यांचे व्यवस्थितपणे पुनर्वसन करा -मुख्यमंत्री योगी म्हणाले, गोरखपूरची स्पर्धा मोठ्या स्मार्ट शहरांशी होत आहे. अशा परिस्थितीत सुरळीत वाहतूक अपरिहार्य आहे. वाहतूक पोलिस आणि महानगरपालिकेने मिळून, अशा व्यवस्था कराव्यात जेणेकरून शहरात कुठेही वाहतूक कोंडी होणार नाही. ते म्हणाले रस्त्यावर हातगाड्या आणि स्टॉल लागणार नाहीत हे निश्चित करा. यासाठी रस्त्यावरील विक्रेत्यांचे व्यवस्थितपणे पुनर्वसन करा.

सरकारी शाळांतील मुलांनी गणवेशातच यावे -मुख्यमंत्री पुढे म्हणाले, "सरकार परिषदांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या पालकांच्या बँक खात्यात गणवेश, बॅग, बूट, मोजे इत्यादींसाठी पैसे पाठवते. हे पैसे केवळ यासाठीच खर्च व्हायला हवेत, याची खात्री करा. शाळांची पाहणी केल्यानंतर, मुले गणवेशातच शाळेत येतील, अशी व्यवस्था करा. यामुळे मुलांमध्ये समन्वय निर्माण होईल आणि सकारात्मक, शिस्तबद्ध वातावरण निर्माण होईल.

लोकप्रतिनिधींना बालवाटिका दाखवा -मुख्यमंत्र्यांनी प्री-स्कूलिंगपूर्वी जिल्ह्यातील मुलांसाठी उघडलेल्या बाल वाटिकाचीही माहिती घेतली. ते म्हणाले, हा एक उत्तम उपक्रम आहे. लोकप्रतिनिधींनाही बाल वाटिका फिरवा आणि गरज भासल्यास सहकार्य घ्या, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. माध्यमिक शाळांसाठी चालवल्या जाणाऱ्या अलंकार प्रकल्पाचाही त्यांनी आढावा घेतला आणि याअंतर्गत होणाऱ्या बांधकामाच्या गुणवत्तेकडे पूर्ण लक्ष देण्यास सांगितले.

गोडधोईया नाला प्रकल्पाचे काम वेगाने व्हावे - मुख्यमंत्री योगी यांनी शहरात साचणाऱ्या पाण्याची  समस्या सोडविण्यासाठी सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी गोडधोईया नाल्याचाही आढावा घेतला. याचे बांधकाम आणखी जलद गतीने होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. एवढेच नाही तर, जर पावसामुळे कामावर परिणाम होत असेल तर पर्यायी व्यवस्था करावी आणि काम सुरळीतपणे पुढे नेले जावे, असेही ते म्हणाले.

एसटीपी तयार करणाऱ्या कंपनीनेच दहा वर्षांसाठी देखभाल करावी -मुख्यमंत्र्यांनी शहरातील अमृत योजनेअंतर्गत होणाऱ्या एसटीपी कामाचाही आढावा घेतला. ते म्हणाले, एसटीपी तयार झाल्यानंतर, देखभाल करणे देखील महत्वाचे आहे. यामुळे, पुढील दहा वर्षांच्या देखभालीसाठी बांधकाम करणाऱ्या कंपनीसोबतच करार करावा.

जर कुठे झाडे तोडायची असतील तर नवी रोपे लावा -यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, जर कोणताही विकास प्रकल्प पुढे नेण्यासाठी कुठे झाडे तोडावीलागत असतील, तर तर त्या जागी नवीन रोपे लावा. रोपांच्या संरक्षणासाठी ट्री गार्ड देखील लावावेत.

या आढावा बैठकीला, केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री आणि बांसगावचे खासदार कमलेश पासवान, गोरखपूरचे खासदार रवी किशन शुक्ला, महापौर डॉ. मंगलेश श्रीवास्तव, आमदार विपिन सिंह, महेंद्रपाल सिंह, राजेश त्रिपाठी, डॉ. विमलेश पासवान, प्रदीप शुक्ला, सर्वन निषाद, आमदार डॉ. धर्मेंद्र सिंह, सीपी चंद आणि प्रशासन तथा विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाChief Ministerमुख्यमंत्री