शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

वाराणसीच्या मंदिरांतील साईबाबांच्या मूर्ती हटवल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 07:09 IST

सनातन रक्षक दलाने केले आंदोलन, आणखी काही मूर्ती हलविण्याची शक्यता

वाराणसी : सनातन रक्षक दल या संघटनेने सुरू केलेल्या आंदोलनामुळे उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील काही मंदिरांतील साईबाबा यांच्या मूर्ती मंगळवारी हटविण्यात आल्या. या संघटनेने बडा गणेश मंदिरातील साईबाबांची मूर्ती तिथून हलवून मंदिराबाहेर आणून ठेवली.

बडा गणेश मंदिराचे मुख्य पुजारी रामू गुरू यांनी सांगितले की, योग्य माहिती नसल्याने साईबाबांच्या मूर्तीची पूजा करण्यात येत होती. ही कृती शास्त्रसंमत नाही. अयोध्येच्या हनुमानगढी मंदिराचे महंत राजू दास यांनी सांगितले की, साईबाबा हे धर्मगुरू, महापुरुष, पीर, अवलिया होऊ शकतात; पण ते देव, ईश्वर असू शकत नाहीत. त्यामुळे वाराणसीच्या मंदिरातून साईबाबांच्या मूर्ती हटविणाऱ्यांना मी धन्यवाद देतो. सनातनी मंडळींनी सर्व मंदिरातून चांदपीर (साईबाबा) यांच्या मूर्ती हटविल्या पाहिजेत, असे मी आवाहन करतो. सनातन दलाचे उत्तर प्रदेशचे अध्यक्ष अजय शर्मा यांनी सांगितले की, काशी म्हणजे वाराणसीमध्ये फक्त भगवान शंकर या सर्वोच्च देवतेचीच पूजा व्हायला हवी. (वृत्तसंस्था)

भक्तांच्या भावनांचा आदर करून वाराणसीतील दहा मंदिरांतून साईबाबा यांच्या मूर्ती हटविण्यात आल्या. येत्या काही दिवसांत अगस्त्यकुंड, भुतेश्वर मंदिरातील साईबाबा मूर्तीही तिथून हलविण्यात येतील, असे सनातन रक्षक दलाचे उत्तर प्रदेशचे अध्यक्ष अजय शर्मा यांनी सांगितले.

‘साईबाबा मूर्ती हटविणे ही अयोग्य कृती’ वाराणसी येथील संत रघुवरदास नगर येथील साईबाबा मंदिराचे पुजारी समर घोष यांनी सांगितले की, स्वत:ला आता सनातनी म्हणवून घेणाऱ्या लोकांनीच पूर्वी मंदिरांमध्ये साईबाबांच्या मूर्तींची स्थापना केली होती. आता तेच या मूर्ती हटविण्याचे काम करत आहेत. देव कोणत्याही रूपात दिसू शकतो. त्यामुळे साईबाबांच्या मूर्ती मंदिरांतून हटविणे ही चुकीची कृती आहे. त्यामुळे समाजातील असंख्य भाविकांच्या भावना दुखावतात. 

टॅग्स :saibabaसाईबाबा