शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

ओठांवरची लिपस्टिक कशी गायब झाली? दांम्पत्याचा वाद, पोलिसांना ताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 07:51 IST

lipstick: आग्रा येथील एक अनोखे प्रकरण व्हायरल झाले आहे. लिपस्टिकवरून एका दांम्पत्याचे इतके कडाक्याचे भांडण झाले की प्रकरण  पोलिस ठाण्यात पोहोचले. अखेर पोलिसांना समुपदेशन केंद्राची मदत घ्यावी लागली.

आग्रा येथील एक अनोखे प्रकरण व्हायरल झाले आहे. लिपस्टिकवरून एका दांम्पत्याचे इतके कडाक्याचे भांडण झाले की प्रकरण  पोलिस ठाण्यात पोहोचले. अखेर पोलिसांना समुपदेशन केंद्राची मदत घ्यावी लागली.  शहीद नगर येथील एक तरुण सिकंदरा भागातील बुटांच्या कारखान्यात काम करतो. त्याचे तीन महिन्यांपूर्वी लग्न झाले. लग्नानंतर पती-पत्नीमध्ये सर्व सुरळीत हो, ते पण अचानक दोघांमधील तणाव वाढला, तोही लिपस्टिकवरून.  

काही दिवसांपूर्वी पती कारखान्यातील नाइट ड्यूटी संपवून घरी आला. रात्री झोपण्यापूर्वी पत्नीने लिपस्टिक लावली होती. पण, सकाळी पत्नीच्या ओठांवरून लिपस्टिक गायब होती. त्यावरून पतीला पत्नीवर संशय आला आणि वाद इतका वाढला, की पत्नी माहेरी निघून गेली आणि पोलिसांत तक्रार केली. वादाचं कारण बघून पोलिसांनीही डोक्यालाच हात लावला. पत्नीने पोलिसांना सांगितले की, सकाळी ब्रश केल्यानंतर तोंड धुतल्यामुळे लिपस्टिक निघून गेली. पती प्रत्येक गोष्टीवरून संशय घेतो. लिपस्टिक गायब झाल्यामुळे मारहाणही केली, म्हणून पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी हे प्रकरण रविवारी कौटुंबिक समुपदेशन केंद्राकडे पाठवले. तिथे समुपदेशकाने समजावल्यानंतर दोघे एकत्र राहण्यास तयार झाल्याचे समजते. तथापि, हे प्रकरण निवळले असले, तरी सोशल मीडियात मात्र चर्चेत आहे.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपUttar Pradeshउत्तर प्रदेश