शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

उत्तर प्रदेशात भाजपाने ४४ जागा कशा गमावल्या? योगींनी सांगितलं खराब कामगिरीचं खरं कारण   

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 14:21 IST

Uttar Pradesh Lok Sabha Election Result 2024: यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपाची अनपेक्षितरीत्या पीछेहाट झाली. तसेच लोकसभेच्या ८० जागा असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये केवळ ३३ जागाच जिंकता आल्याने भाजपाला लोकसभेत बहुमत मिळवण्यात अपयश आले. उत्तर प्रदेशमधील निकालांमुळे भाजपाला मोठा धक्का बसला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने २०१४ आणि २०१९ मध्ये मिळवलेल्या मोठ्या विजयामध्ये उत्तर प्रदेशमध्ये मिळालेल्या यशाचा मोठा वाटा होता. मात्र यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपाची अनपेक्षितरीत्या पीछेहाट झाली. तसेच लोकसभेच्या ८० जागा असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये केवळ ३३ जागाच जिंकता आल्याने भाजपाला लोकसभेत बहुमत मिळवण्यात अपयश आले. उत्तर प्रदेशमधील निकालांमुळे भाजपाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, भाजपाच्या या सुमार कामगिरीबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाजपाच्या कार्यसमितीच्या बैठकीत आपलं मत मांडलं आहे. आम्हाला अतिआत्मविश्वासामुळे पराभवाचा सामना करावा लागला, तसेच यापुढे अशी चूक करू नका, असा सल्ला योगींनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

योगी आदित्यनाथ म्हणाले की, जेव्हा आपण अतिआत्मविश्वासामध्ये असतो. जेव्हा जिंकत असतो. तेव्हा स्वाभाविकपणे कुठे ना कुठे फटका बसतो. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी या स्थितीत बॅकफूटवर येण्याची आवश्यकता नाही. कारण तुम्ही तुमचं काम योग्य पद्धतीने केलं आहे. तुम्ही जेव्हा विरोधी पक्षांमध्ये होता, तेव्हा जनतेच्या समस्या दूर करण्यासाठी संघर्ष करत होता. आता उत्तर प्रदेशमध्ये आपलं सरकार आहे. तेव्हा तुम्हाला सुरक्षित वातावरण दिसत आहे.  

योगी पुढे म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये १० जागांवर होऊ  घातलेली विधानसभेची पोटनिवडणूक आणि २०२७ च्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वांनी सक्रिय राहिलं पाहिजे. लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांसह, आमदार, विधान परिषदेचे सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर, ब्लॉक प्रमुख, नगरसेवक या सर्वांनी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली पाहिजे. आपल्याला पुन्हा एकदा राज्यात भाजपाचा झेंडा फडकवायचा आहे, असे योगी यांनी सांगितले. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये  भाजपाला ३३ तर भाजपाच्या मित्र पक्षांना ३ जागा मिळाल्या होत्या. तर समाजवादी पक्षाने ३७ आणि काँग्रेसने ६ जागांवर विजय मिळवला होता. एक जागा अपक्षाने जिंकली होती. मागच्या दहा वर्षांपासून उत्तर प्रदेशात एकतर्फी वर्चस्व राखणाऱ्या भाजपासाठी हा एक मोठा धक्का होता.   

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाUttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४