शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ह्रदयद्रावक... मोबाईल चार्जिंग करताना स्फोट; भीषण दुर्घटनेत ४ लहानग्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 17:56 IST

मुजफ्फरनगरचे मूळ रहिवाशी असलेल्या जॉनी यांचे कुटुंब पल्लवपुरम येथील जनता कॉलोनीत भाड्याचा घरात राहात आहे.

मेरठ - उत्तर प्रदेशातील एका घरात मोबाईल चार्जिंग करताना भीषण अपघाताची घटना घडली. या दुर्घटनेतील कुटुंबातील ४ लहानग्यांचा मृत्यू झाला असून २ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. मोबाईल चार्जिंग करताना शार्ट सर्कीट होऊन स्फोट झाल्याने आगीत जळून चौघांना मृत्यू झाला आहे. मेरठमधील पल्लवपुरम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जनता कॉलोनी परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मुजफ्फरनगरचे मूळ रहिवाशी असलेल्या जॉनी यांचे कुटुंब पल्लवपुरम येथील जनता कॉलोनीत भाड्याचा घरात राहात आहे. जॉनी हा मजुरीचं काम करत असून होळीचा दिवस असल्याने तो घरात नव्हता. घरात त्याची पत्नी बबिता जेवण बनवत होती. तर, जॉनीची मुलगी सारिका (१०), निहारिका (८)  आणि मुलगा गोलू (६) व कालू (५) हेही घरात होते. यावेळी घरातील इलेक्ट्रीक बोर्डवर मोबाईल चार्जिंगसाठी लावण्यात आला होता. अचानक चार्जिंगला लावलेल्या मोबाईलमध्ये शॉट सर्कीट झाले अन् स्फोट झाला. 

चार्जिंग वायरमधील स्फोटानंतर ठिणगी बाजूलाच असलेल्या बेडवर पडल्याने घरात आगीता भडका उडाला. या आगीने रौद्र रुप धारण केल्याने घरातील लहानगी मुलेही आगीच्या झोतात आली. त्यावेळी, मोठी मुलगी सारिका आणि तिची आई बबिता यांनी मुलांना वाचवण्यासाठी धडपड केली. त्यामध्ये, या दोघीही गंभीर जखमी (भाजल्या) झाल्या आहेत. आगीच्या घटनेची माहिती मिळताच शेजाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, आगीत जखमी झालेल्या सर्वांनाच खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, निहारिका आणि कालू यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. तर, दुसऱ्या दिवशी उपचारादरम्यान आणखी दोन बालकांचा मृत्यू झाला. 

दरम्यान, बबिता आणि जॉनी यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांचीही प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, या ह्रदयद्रावक घटनेनं संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. 

टॅग्स :fireआगMobileमोबाइलmeerut-pcमेरठUttar Pradeshउत्तर प्रदेशhospitalहॉस्पिटल