शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानवापीच्या तळघरात पूजा सुरुच राहणार; मशीद समितीला अलाहाबाद उच्च न्यायालयाचा झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 14:50 IST

ज्ञानवापी संकुलातील पूजा थांबवण्यासाठी मशीद समितीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Gyanvapi Case: वाराणसीतील ज्ञानवापीचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. जिल्हा न्यायालयाने येथील व्यासजी तळघरात पूजेची परवानगी दिली आहे. पण, मशीद समितीनेही याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली असून, ही पूजा थांबवण्यासाठी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर शुक्रवारी(दि.2) अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने मशीद समितीला झटका देत व्यास तळघरातील पूजा सुरुच राहणार असल्याचे सांगितले. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

मशीद समितीने ज्ञानवापीच्या व्यास तळघरातील पूजेच्या विरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, परंतु न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. व्यास तळघरात पूजा सुरू राहणार असून या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 फेब्रुवारीला होणार आहे. तोपर्यंत पूजेवर बंदी नसेल. एएसआयच्या अहवालावर वाराणसी जिल्हा न्यायालयात 6 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारलाही ही जागा संरक्षित करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर येथे कोणतेही नुकसान किंवा बांधकाम होऊ नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.

न्यायालयाने म्हटले की, जिल्हाधिकाऱ्यांची रिसीव्हर नेमणूक झाली, तेव्हा तुम्ही विरोध केला नाही आणि हा युक्तिवाद मशीद समितीसाठी धोक्याचा ठरला. आता मशीद समितीला आपल्या अपीलमध्ये सुधारणा करुन जिल्हा न्यायाधीशांच्या 17 जानेवारीच्या आदेशाला आव्हान देण्यास सांगण्यात आले आहे. 

विष्णू शंकर जैन यांनी मांडली बाजू सुनावणी करणारे न्यायाधीश रोहित रंजन अग्रवाल यांनी मशीद समितीच्या वकिलांना म्हटले की, तुम्ही डीएमला रिसीव्हर म्हणून नियुक्त करण्याच्या 17 जानेवारीच्या आदेशाला आव्हान न देता थेट 31 जानेवारीच्या आदेशाविरोधात याचिका दाखल केली. अशा परिस्थितीत तुमच्या अर्जाची मेंटेनेबिलिटी काय आहे? 31 जानेवारीचा आदेश, हा 17 जानेवारी रोजी डीएमच्या रिसीव्हर म्हणून नियुक्तीच्या आदेशाचा पुढचा भाग आहे. यानंतर हिंदू पक्षाने मशीद समितीच्या याचिकेवर आक्षेप व्यक्त केला आणि याचिका फेटाळण्याचे आवाहन केले. हिंदू पक्षातर्फे अधिवक्ता विष्णू शंकर जैन यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Gyanvapi Mosqueज्ञानवापी मशीदVaranasiवाराणसीHigh Courtउच्च न्यायालयHinduहिंदूMuslimमुस्लीम