शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! "10 लाख आण, मग हनिमून करू", नवऱ्याची अट; अश्लील फोटो काढून करतो ब्लॅकमेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 08:31 IST

हुंडा म्हणून 10 लाख रुपये न मिळाल्याने लग्नाला तीन महिने उलटूनही वराने शारीरिक संबंध ठेवले नसल्याचा आरोप आहे.

उत्तर प्रदेशातील पीलीभीतमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी हुंडा म्हणून 10 लाख रुपये न मिळाल्याने लग्नाला तीन महिने उलटूनही वराने शारीरिक संबंध ठेवले नसल्याचा आरोप आहे. दोन्ही कुटुंबांमध्ये 5 लाख रुपयांचा करार झाला, त्यानंतर वधू-वर हनिमूनसाठी नैनितालला गेले. पण नैनितालमध्येही पती पत्नीपासून दूर राहिल्याचा आरोप आहे. तसेच नैनितालमध्ये काही अश्लील फोटो काढल्याचा आरोप तरुणीने केला आहे. यानंतर त्याने ब्लॅकमेलिंग आणि हुंड्याची मागणी सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. 

व्यथित झालेल्या पत्नीने पीलीभीत कोतवाली पोलीस ठाण्यात सासू आणि पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि न्यायाची मागणी केली. नवरा आणि सासू तिच्यावर अत्याचार करून हुंड्याची मागणी करत असल्याचा आरोप वधूने केला आहे. पीडितेचे म्हणणे आहे की, तिचा विवाह 6 फेब्रुवारी 2023 रोजी बदायू पोलीस स्टेशनच्या बिसौली भागातील एका तरुणाशी झाला होता. नातेवाईकांनी क्षमतेनुसार 20 लाख रुपये खर्च केले होते.

"10 लाख रुपये द्या म्हणजे हनिमूनला जाऊ"

15 लाखांचे दागिनेही हुंडा म्हणून देण्यात आले. पण, पतीने लग्नानंतर हनिमून साजरा केला नाही. तसेच लग्नाच्या तीन महिन्यांनंतरही पतीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले नाहीत. 29 मार्च रोजी तिने सासूला या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. मात्र तिने त्याकडे लक्षही दिले नाही. काही दिवसांनी पीडित मुलगी पीलीभीत येथील तिच्या घरी आली आणि तिने सर्व प्रकार आईला सांगितला. यानंतर 22 एप्रिल रोजी पीडितेचा पती तिला घेण्यासाठी आला असता, सासूने सुनेला काही आजार असल्यास सांगा, आम्ही उपचार करून घेऊ, असे सांगितले. यावर नवरा म्हणाला, 10 लाख रुपये द्या म्हणजे हनिमूनला जाऊ.

5 लाख रुपये देऊन हनिमूनला पाठवले

कुटुंबीयांनी पाच लाख रुपये दिले आणि 7 मे रोजी दोघेही हनिमूनला नैनितालला गेले. वधूने सांगितले की ती तिच्या पतीसोबत एकाच खोलीत राहिली. मात्र, पतीने तिचे अश्लील फोटो आणि व्हिडrओ बनवले. उरलेले 5 लाख रुपये घेऊन ये म्हणाला. न दिल्यास हा फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करेन अशी धमकी दिली. महिला माहेरी आली आणि तिने सर्व प्रकार तिच्या कुटुंबीयांना सांगितला. यानंतर पीडितेने पोलीस ठाण्यात सासू आणि पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलीस अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारी