शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

यूपी सरकारचे माजी मंत्री आशुतोष टंडन यांचे निधन; राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला शोक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 16:05 IST

आशुतोष टंडन हे योगी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात मंत्रीही होते.

नवी दिल्ली: उत्तर प्रदेश सरकारचे माजी मंत्री आणि लखनौ पूर्वचे आमदार आशुतोष टंडन उर्फ ​​गोपाल जी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे. आशुतोष टंडन हे योगी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात मंत्रीही होते. आशुतोष टंडन यांच्या X या सोशल मीडिया अकाउंटवरही त्यांच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे. 

आशुतोष टंडन यांच्या निधनानंतर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आणि लखनौ पूर्वचे आमदार आशुतोष टंडन उर्फ ​​'गोपालजी' यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. त्यांचे राजकीय जीवन लखनौच्या जनतेच्या सेवेसाठी समर्पित होते. पक्ष मजबूत करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. लखनौ आणि राज्याच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील. या दु:खाच्या प्रसंगी, मी त्यांच्या शोकाकुल कुटुंबाप्रती मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो, असं राजनाथ सिंह म्हणाले.

आशुतोष टंडन उर्फ ​​गोपाल जी हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेश आणि बिहारचे राज्यपाल दिवंगत लालजी टंडन यांचे पुत्र होते. लालजी टंडन हे यूपीमधील भाजपाचे प्रमुख आधारस्तंभ आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे मित्र आणि सहकारी होते. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यूyogi adityanathयोगी आदित्यनाथ