प्रयागराज - महाकुंभसाठी प्रयागराज इथं देशभरातून साधू संत जमा होऊ लागले आहेत. १४४ वर्षानंतर संगम तटावर महाकुंभचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यात नागा साधू, हटयोगी, खडेश्वरी बाबा, रुद्राक्षधारी बाबा यासह विविध आखाड्याचे साधू आले आहेत. त्यातील अनेकांनी कित्येक दशके वेगवेगळी साधना आणि हटयोग तपस्या केली आहे. असेच एक बाबा अनेक वर्ष डोक्यावर ४५ किलोचं रुद्राक्ष धारण केलेले आहेत. त्यांच्या या कठीण तपस्येचे कारण जाणून घेऊया.
१३ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी एक हटयोगी बाबा वेगळ्याच वेशात दिसून येतात. त्यांनी त्यांच्या डोक्यावर ४५ किलो वजनाची रुद्राक्षाची जपमाळ धारण केली आहे. १३ आखाड्यांपैकी एक असलेल्या आवाहन आखाड्याचे ते सचिव आहेत. गेली अनेक वर्षे असेच भारी वजनाचे रुद्राक्ष ते डोक्यावर ठेवून तपस्या करत आहेत. अनेक वर्षांपासून ४५ किलो रुद्राक्ष माळ डोक्यावर धारण केली जाते. २४ तासांपैकी १२ तास ते डोक्यावर ठेवतात. जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, त्यांनी असा हटयोग करण्याचा निर्णय का घेतला? तेव्हा मी हा हटयोग देवाला प्रसन्न करण्यासाठी आणि माझ्या सनातन धर्माचे रक्षण करण्यासाठी करत आहे असं सांगितले.
भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी हटयोग
असं करून आम्ही भगवान शंकराचा जप करत आहोत. यासाठी आपण कठोर तपश्चर्या करतो. हे हटयोगी बाबा वयाच्या अडीच वर्षापासून संत बनलेत. बालपणीच त्यांनी आखाड्याला जीवन दिले आहे. ते जलप्रवाह, अग्नी तपश्चर्या, समाधी तपश्चर्या यातून गेले आहेत. त्यांच्याकडून चमत्कारही मिळाल्याचं ते सांगतात. हा हटयोग सर्वांच्या आवाक्यात नसतो. केवळ संत साधू हटयोग साधना करतात. आम्ही सनातन धर्म रक्षक आहोत असं त्यांनी म्हटलं.
दरम्यान, हे हटयोगी बाबा पंजाबच्या बाबा दुधारी नावाची गादी चालवतात. त्याठिकाणी दुधेश्वर महादेव यांची दुधारी महाराज पूजा करत होते. ते संपूर्ण आयुष्य फक्त दूध पिऊन जगले. त्यांच्या अधिपत्यात वयाच्या अडीच वर्षात या बाबांना दान केले. आमचे गुरु महाराज श्री नारायण गिरी मंडळाच्या आश्रयाने आणि दुधारी बाबांच्या आशीर्वादाने आम्हाला हा ४५ किलोचा रुद्राक्ष डोक्यावर धारण करण्याचे बळ मिळाले असंही त्यांनी सांगितले.