शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

'मिट्टी में मिला देंगे...', उत्तर प्रदेशातील 'योगी'राजमध्ये सात वर्षात 12 हजार एन्काउंटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 19:22 IST

Encounter In Yogi Adityanath Tenure: योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यातील पोलिसांना फ्री हँड देण्यात आला आहे.

Bahraich Encounter :उत्तर प्रदेशातील बहराइच हिंसाचाराच्या मुख्य आरोपींचा पोलिसांनी आज एनकाउंटर केला. नेपाळमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींच्या पायावर पोलिसांनी गोळी झाडली असून, सध्या आरोपींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आजच्या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि यूपी पोलीस पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. काही आठवड्यांपूर्वी एक डेटा समोर आला होता, ज्यामध्ये योगींच्या काळात झालेल्या चकमकींची आकडेवारी देण्यात आली होती. 

या आकडेवारीनुसार, योगी सरकारच्या काळात पहिली चकमक सहारनपूरमध्ये झाली. 2017 मध्ये योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यात मन्सूर पहेलवानचा पहिला एनकाउंटर झाला होता. यानंतर पोलिसांनी अनेक कुख्यात गुंडांचा एन्काउंटर केला. यातील अनेक एन्काउंटरवर प्रश्नही उपस्थित केले गेले आहेत.

योगींच्या कार्यकाळात किती चकमकी झाल्या?20 मार्च 2017 ते 5 सप्टेंबर 2024 पर्यंतच्या आकडेवारीनुसार यूपी पोलिसांनी एकूण 12 हजार 964 चकमकींची माहिती दिली आहे. यामध्ये 207 संशयित गुन्हेगारांचा मृत्यू झाला असून 27 हजार 117 गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. या चकमकीत 1 हजार 601 गुन्हेगार जखमीही झाले आहेत. या आकडेवारीनुसार, सरासरी दर 13व्या दिवशी एका  गुन्हेगाराशी चकमक झाली आहे.

किती पोलीस शहीद झाले?या चकमकीत फक्त गुन्हेगारच मारले गेले नाही, तर 17 पोलीसही शहीद झाले आहेत. याशिवाय, हजारो पोलीस जखमीही झाले आहेत. योगी सरकारच्या काळात मारल्या गेलेल्या गुन्हेगारांवर 75 हजार रुपयांपासून ते 5 लाख रुपयांपर्यंतचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

चकमकीत मारल्या गेलेल्या गुन्हेगारांची जातजातीनिहाय गुन्हेगारांवर नजर टाकली, तर या चकमकीत मुस्लिम गुन्हेगार 67, ब्राह्मण 20, ठाकूर 18, यादव 16, दलित 14, एसटी 3, शीख 2, इतर ओबीसीतील 8 गुन्हेगार मारले गेले आहेत. याशिवाय इतर जाती-धर्मातील एकूण 59 गुन्हेगार मारले गेले आहेत. दरम्यान, योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर चकमकी आणि बुलडोझर कारवाईची सुरुवात झाली. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस