शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरच्या वेशात नराधम! गुंगीचे इंजेक्शन देऊन महिलांवर बलात्कार करायचा, एका पेशंटने बिंग फोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 09:30 IST

दिल्लीच्या रोहिणी भागात एक महिला काही काळापासून आजारी होती. तिला गाजियाबादमधील खोडा येथील डॉक्टर साकिबबाबत माहिती मिळाली.

उत्तर प्रदेशच्या गाझिय़ाबादमध्ये एका डॉक्टरने सहकारी डॉक्टरच्या साथीने उपचारासाठी आलेल्या एका महिलेवर सामुहिक बलात्कार केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यापूर्वीही त्याने त्याच्याकडे येणाऱ्या तरुणी, महिलांवर असेच बलात्कार केल्याचे कबुलही केले आहे. पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केली असून त्याचा साथीदार अद्याप फरार आहे. 

दिल्लीच्या रोहिणी भागात एक महिला काही काळापासून आजारी होती. तिला गाजियाबादमधील खोडा येथील डॉक्टर साकिबबाबत माहिती मिळाली. म्हणून तिने त्याला फोन केला. साकिबने तिला पूर्णपणे बरे करण्याचे आश्वासन दिले. या आशेने ती महिला खोडाला गेली. 

पहिल्या व्हिजिटमध्ये डॉक्टरने तिला काही औषधे दिली, परंतू त्याने बरे वाटले नाही. म्हणून पुन्हा १९ जूनला तिला डॉक्टरने बोलवून घेतले. यावेळी तिला गुंगीचे इंजेक्शन दिले. यानंतर डॉ. साकिबने त्याचा मित्र डॉक्टर जकीसोबत तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. जेव्हा त्या महिलेला शुद्धी आली तेव्हा तिच्या अंगावर कपडे नव्हते. डॉक्टरने तिला याबाबत कोणाला सांगिते तर तिचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. 

काही दिवस महिला घाबरल्याने कोणाला काहीच बोलली नाही. नंतर तिने आरोपी डॉक्टरविरोधात पोलिसांत धाव घेतली. यापूर्वीही असे अनेक तरुणी, महिलांवर बलात्कार केल्याचे त्या डॉक्टरनेच आपल्याला सांगितल्याचे या पीडित महिलेने पोलिसांना सांगितले.  

टॅग्स :doctorडॉक्टरMolestationविनयभंगUttar Pradeshउत्तर प्रदेश