शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
2
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
3
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
4
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
5
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
6
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
7
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
8
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
9
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
10
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
11
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
12
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
13
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
14
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
15
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
16
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
17
VHT 2025-26 : पांड्याचं 'तांडव'! वनडेत ठोकली टी-२० स्टाईल सेंच्युरी; संघाने जिंकली ४०० पारची लढाई
18
Hello 2026! न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे जंगी स्वागत; ऑकलंडच्या स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी
19
साबणापासून फेस पॅकपर्यंत... गाढविणीच्या दुधामुळे पालटलं नशीब, आता करतेय लाखोंची कमाई
20
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी योजनांचे फायदे प्रत्येक पात्र कुटुंबापर्यंत पोहोचावेत; योगी आदित्यनाथ यांचे नवे मिशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 12:06 IST

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात सात प्राधान्य योजनांचा पूर्ण समावेश असेल.

लखनऊ: उत्तर प्रदेश दारिद्र्यमुक्त करण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पूर्तता करण्याच्या दिशेने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. उत्तर प्रदेशात "शून्य दारिद्र्य अभियान" मिशन मोडवर पुढे नेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विभागीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. कोणतेही पात्र कुटुंब सरकारी योजनांच्या लाभांपासून वंचित राहणार नाही अशा स्पष्ट सूचना दिल्या.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात सात प्राधान्य योजनांचा पूर्ण समावेश असेल. रेशन कार्ड, दिव्यांग पेन्शन, विधवा पेन्शन, वृद्धापकाळ पेन्शन, पंतप्रधान किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री आवास योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (आयुष्मान भारत), या योजनांचा समावेश आहे. 

एक महिनाभराची विशेष मोहीम सुरू करावी

मुख्यमंत्री योगी यांनी अधिकाऱ्यांना पहिल्या टप्प्यातील सर्व योजनांचे कव्हरेज १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत, तर दुसऱ्या टप्प्यातील योजनांची पडताळणी प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.  कोणत्याही कारणास्तव, या प्राधान्य योजनांपासून वंचित राहिलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांची ओळख पटविण्यासाठी एक महिनाभराची विशेष मोहीम सुरू करावी, असेही त्यांनी सांगितले. शून्य गरिबी मोहिमेचे प्राथमिक उद्दिष्ट प्रत्येक पात्र कुटुंबाला सरकारी योजनांचा लाभ मिळावा हे सुनिश्चित करणे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

दरम्यान, पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभ घेण्याऱ्या कुटुंबांसाठी अर्ज निश्चित केले जावे. सर्व लाभार्थ्यांच्या संपूर्ण कुटुंबाची रेशन कार्डवर नोंदणी करावी. ही विशेष मोहीम केवळ गरीब कुटुंबांना सामाजिक सुरक्षा प्रदान करत नाही तर त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण केल्या जातील, याची खात्री करण्याचा यूपी सरकारचा मानस आहे. अधिकाऱ्यांना मोहिमेच्या प्रगतीचा नियमितपणे आढावा घेण्याचे आणि जिल्ह्यांमध्ये मोहिमेचे प्रभावी निरीक्षण सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Yogi Adityanath's mission: Government benefits for every eligible family.

Web Summary : UP government launches mission to ensure all eligible families receive benefits from key schemes like ration cards, pensions, housing, and healthcare. A month-long campaign will identify and enroll those currently excluded, guaranteeing social security and basic needs are met.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथState Governmentराज्य सरकार