शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

'विकसित उत्तर प्रदेश २०४७' मोहिमेत लोकांनी मोठ्या संख्येने पुढाकार घ्यावा; CM योगी आदित्यनाथ यांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 17:15 IST

हा उपक्रम केवळ प्रशासकीय प्रयत्न नाही, तर जनतेच्या सहभागाने राज्य समृद्ध आणि विकसित करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. 

लखनौ - २०४७ पर्यंत उत्तर प्रदेशला विकसित राज्य बनवण्याच्या दृष्टीने "समर्थ उत्तर प्रदेश, विकसित उत्तर प्रदेश २०४७" या अभियानाची सुरूवात करण्यात आली आहे. यातून सर्वसामान्य नागरिकांना त्यांची मते आणि सूचना सरकारपर्यंत पोहचवता येणार आहेत. पुढील महिनाभर चालणाऱ्या या महाअभियानासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौच्या लोक भवन येथे विशेष QR कोड आणि ऑनलाइन पोर्टलचं उद्घाटन केले. यातून लोक त्यांच्या सूचना मांडू शकतात. या अभियानात जास्तीत जास्त लोकांनी पुढाकार घेऊन त्यांच्या सूचना मांडाव्यात असं आवाहन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. 

QR कोड आणि ऑनलाइन पोर्टल

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या कार्यक्रमात म्हणाले की, सूचना देण्याची प्रक्रिया सोपी आणि सुलभ करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी, शाळा, कॉलेज येथे हे QR कोड लावण्यात येतील. लोकांनी या कोडवर स्कॅन करून त्यांच्या सूचना थेट पोर्टलवर मांडू शकतात. सोबतच विकसित ऑनलाइन पोर्टल  https://samarthuttarpradesh.up.gov.in या माध्यमातून लोक त्यांची मते आणि प्रस्तावही सादर करू शकतील असं त्यांनी सांगितले.

चांगल्या सूचनेला मिळणार पुरस्कार

त्याशिवाय विकसित उत्तर प्रदेशासाठी प्राप्त होणाऱ्या चांगल्या आणि उपयुक्त सूचनांची निवड  तज्ज्ञ आणि निती आयोग करेल. निवड झालेल्या चांगल्या सूचनांना राज्यस्तरीय पुरस्कार सरकारकडून दिला जाईल. हे पाऊल केवळ सूचना मिळवण्यासाठी नाही तर लोकांनाही राज्याच्या उभारणीत योगदान देऊन विकसित राज्याचे ध्येय निश्चित करण्यासाठी आहे असंही योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं. 

दरम्यान, या कार्यक्रमाला ४०० हून अधिक तज्ज्ञमंडळी उपस्थित होते, ज्यांनी मोहिमेच्या कृती आराखड्यावर आणि लोकसहभागाचे महत्त्व यावर चर्चा केली. हा उपक्रम केवळ प्रशासकीय प्रयत्न नाही, तर जनतेच्या सहभागाने राज्य समृद्ध आणि विकसित करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश