शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

भाजप खासदार रामशंकर कठेरिया यांना दोन वर्षांची शिक्षा, खासदारकी जाऊ शकते! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 18:34 IST

साकेत मॉलमधील टोरेंट कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड करून गोंधळ घातल्याचा आरोप भाजप खासदारावर करण्यात आला होता.

उत्तर प्रदेशातील इटावा येथील भाजप खासदार राम शंकर कठेरिया यांना आग्रा येथील न्यायालयात एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. येथील एमपी-एमएलए न्यायालयाने राम शंकर कठेरिया यांना कलम १४७ आणि ३२३ अंतर्गत दोषी ठरवले आहे. 

साकेत मॉलमधील टोरेंट कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड करून गोंधळ घातल्याचा आरोप भाजप खासदारावर करण्यात आला होता.  ही घटना १६ नोव्हेंबर २०११ रोजी घडली होती. या प्रकरणी न्यायालयाने राम शंकर कठेरिया यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. यासोबतच ५० हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. अशा स्थितीत राम शंकर कठेरिया यांची खासदारकी जाऊ शकते, म्हणजेच संसदेचे सदस्यत्व संपुष्टात येऊ शकते. दरम्यान, टोरेंट पॉवर लिमिटेड आग्राच्या साकेत मॉल कार्यालयात व्यवस्थापक भावेश रसिक लाल शाह वीज चोरीशी संबंधित प्रकरणांची सुनावणी आणि निकाल देत होते. यादरम्यान, स्थानिक खासदार राम शंकर कठेरिया यांच्यासोबत आलेल्या १० ते १५ समर्थकांनी भावेश रसिक लाल शाह यांच्या कार्यालयात घुसून हाणामारी केली. 

या घटनेत भावेश रसिक शाह यांना दुखापत झाली होती. यानंतर टोरंट पॉवरचे सुरक्षा निरीक्षक समेधी लाल यांनी हरिपर्वत पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, खासदार राम शंकर कठेरिया आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी हरिपर्वत पोलीस ठाण्याने खासदार राम शंकर कठेरिया यांच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र पाठवले होते. या खटल्यातील साक्ष आणि वादविवादाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शनिवारी निकाल सुनावण्यात आला.

काय म्हणाले राम शंकर कठेरिया?याप्रकरणी भाजप खासदार राम शंकर कठेरिया यांनी म्हटले आहे की, मी माननीय न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो आणि स्वीकारतो. माझा अधिकार वापरून मी यापुढे अपील करेन. दरम्यान, राम शंकर कथेरिया हे आग्रा येथून खासदारही राहिले आहेत. ते राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्षही राहिले आहेत.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाMember of parliamentखासदार