शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्या राम मंदिरात ४ दिवस व्हीआयपी दर्शन बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 11:28 IST

रामनवमीनिमित्त मार्गदर्शक सूचना जारी, सर्व ऑनलाइन पास केले रद्द

अयोध्या: रामनवमी संदर्भात श्रीराम मंदिर ट्रस्टने मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून १५ ते १८ एप्रिलपर्यंत व्हीआयपी दर्शनावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय रामनवमीला भाविकांना इतर अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. ज्या भाविकांनी १५ ते १८ एप्रिल दरम्यान ऑनलाइन पाससाठी अर्ज केले होते, ते सर्व पासही रद्द करण्यात आले आहेत. राम मंदिर ट्रस्टच्या सरचिटणीसांनी रामलल्लांच्या जयंतीनिमित्त लोकांना मोबाइल फोन सोबत आणू नका, असे आवाहन केले आहे. 

यंदा अयोध्येतील विशाल राम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. त्यामुळे अयोध्येत रामनवमीची तयारी जोरात सुरू आहे. रामनवमीच्या दिवशी रामलल्लांचे दर्शन घेण्यासाठी ५० लाखांहून अधिक भाविक अयोध्येत पोहोचतील, असा अंदाज आहे. आता राम भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेनेही तयारी जोरात सुरू केली आहे. 

१,११,१११ किलो लाडूंचा प्रसाद अयोध्येला पाठवणाररामनवमीच्या निमित्ताने अयोध्येतील रामलल्ला मंदिरात १७ एप्रिल रोजी प्रसाद म्हणून १,११,१११ किलो लाडू प्रसाद म्हणून पाठवले जातील, असे उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील देवराह हंस बाबा ट्रस्टचे विश्वस्त अतुल कुमार सक्सेना यांनी सांगितले. देवराह हंस बाबा आश्रमातर्फे काशी विश्वनाथ मंदिर असो किंवा तिरुपती बालाजी मंदिर असो, मंदिरांना प्रसादाची पाच हजार पाकिटे पाठवली जातात. प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी देवराह हंस बाबा आश्रमाने ४४,४४० किलोंचे लाडू प्रसादासाठी पाठवले होते, असेही त्यांनी सांगितले.

महापालिकेची पादुका सेवाअयोध्येत येणाऱ्या लाखो भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबत रामपथ, धर्मपथ तसेच जन्मभूमी मार्गावर पिण्याच्या पाण्याची तात्पुरती सोय सुरू करण्यात आली आहे. याशिवाय महापालिकेतर्फे अयोध्येत ८ ठिकाणी पादुका सेवा सुरू करण्यात आली आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या