शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येत प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेपूर्वीच सुरू होणार विमानतळ, ३५० कोटींचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 18:57 IST

लोकसभा निवडणुकांच्या अगोदर जानेवीर २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.

वाराणसी - अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होऊन मंदिराचे दरवाजे सर्वसामान्य जनतेसाठी कधी खुले केले जाणार? या प्रश्नाचे उत्तर अखेर समोर आले आहे. राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी तारीखच जाहीर केली. १५ जानेवारी २०२४ ते २४ जानेवारी २०२४ दरम्यान राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. तर, गृहमंत्री अमित शहा यांनीही यासंदर्भात जाहीरपणे माहिती दिली होती. आता, अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठीचे विमानतळही लवकरच पूर्णत्वास येत आहे. 

लोकसभा निवडणुकांच्या अगोदर जानेवीर २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. विशेष म्हणजे श्रीराम मंदिराचा हा उत्सव १० दिवस चालणार असून देशभरातील जनतेला या सोहळ्यात सहभागी करुन घेतलं जाणार आहे. तर, लाखो भाविक येथे दर्शनासाठी, या सोहळ्यासाठी येणार आहेत. त्यामुळे, अगोदरच तिकीट काढून ठेवा, अशा सूचनाही यापूर्वी अमित शहांनी केल्या होत्या.  प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी अयोध्येत एक नवीन विमानतळ तयार होत आहे. ३५० कोटी रुपये खर्चून तयार होत असलेल्या या विमानतळाचे काम युद्धपातळीवर सुरू असून सप्टेंबर २०२३ पर्यंत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. तसेच, ६२५० मीटर वर्ग एवढ्या विस्तीर्ण जागेत पसरलेल्या या विमानतळाच्या अंतरिम भवनात श्री राम यांचं चित्रण करण्यात आलं आहे. ज्यामुळे, प्रवाशांना अध्यात्मिकतेची अनुभूती होईल. प्रभू श्रीराम यांची जीवनगाथाही येथून पाहायला मिळेल. तर, धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना समृद्धीचे नवे द्वारही खुले होईल, असे ज्योतिरादित्य शिंदेंनी ट्विट करुन म्हटलं आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या