शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

कॉन्स्टेबलशी अफेअर, तिच्यासोबत हॉटेलमध्ये सापडला; प्रेयसीमुळे DSP चा झाला थेट कॉन्स्टेबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 08:26 IST

महिला कॉन्स्टेबलसोबत हॉटेलमध्ये सापडला; प्रेयसीमुळे DSP चा झाला थेट कॉन्स्टेबल

उन्नाव : शक्यतो लोकांना आपल्या कामात घेत असलेल्या मेहनतीमुळे नोकरीत प्रमोशन मिळत जाते, मात्र उन्नावचे पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) असलेले कृपाशंकर कनोजिया यांना मात्र डीएसपी पदावरून हटवत थेट कॉन्स्टेबल बनवण्यात आले. कानपूरमधील एका हॉटेलमध्ये महिला कॉन्स्टेबलसोबत पकडल्यानंतर त्यांचे डिमोशन करण्यात आले आहे.

पीएसीमध्ये कॉन्स्टेबल पदावरून प्रमोशन मिळाल्यानंतर कृपाशंकर डीएसपी पदापर्यंत पोहोचले होते. २२ जून रोजी अतिरिक्त पोलिस महासंचालक यांनी जारी केलेल्या आदेशानंतर त्यांना पीएसीच्या २६ बटालियनमध्ये तैनात करण्यात आले.

कॉन्स्टेबलशी अफेअर- कृपाशंकर यांना जुलै २०२१ मध्ये उन्नाव जिल्ह्यातील बिघापूर सर्कलमध्ये सीओ म्हणून नियुक्त करण्यात आले.- यादरम्यान त्यांचे एका महिला कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध सुरू झाले होते. दोघेही आधीच विवाहित आहेत. - महिलेचा पती प्रयागराज येथील पोलिस ठाण्यात हवालदार म्हणून तैनात होता.

दोघांना असे पकडले...

  • ६ जुलै २०२१ रोजी कृपाशंकर यांनी उपचारासाठी रजा घेतली होती. मात्र घरी जाण्याऐवजी ते महिला कॉन्स्टेबलसोबत कानपूर येथील एका हॉटेलवर गेले. कृपाशंकर यांनी तिच्या नावावर रूम बुक केली.
  • या दरम्यान पत्नीने त्यांना फोन केला असता त्यांचा फोन बंद असल्याचे आढळले. यानंतर पत्नीने थेट उन्नावचे एसपी आनंद कुलकर्णी यांना फोन करून संपूर्ण प्रकार सांगितला.
  • पोलिसांनी त्यांचे लोकेशन शोधले असता ते कानपूरच्या मॉल रोडवरील हॉटेलमध्ये सापडले. यानंतर पोलिसांचे पथक हॉटेलवर पोहोचले असता कृपाशंकर सायंकाळी ५ वाजल्यापासून एका महिलेसोबत खोलीत असल्याचे आढळून आले. यावेळी कृपाशंकर आणि त्यांच्या पत्नीमध्ये जोरदार वाद झाला.

कॉन्स्टेबलच्या पतीने दिला घटस्फोटहॉटेलमध्ये प्रवेश करताना कृपाशंकर आणि त्यांची प्रेयसी सीसीटीव्हीत कैद झाली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज सोबत घेतले. प्रशासनानी प्रतिमा खराब केल्याबद्दल कृपाशंकर यांना थेट कॉन्स्टेबल करण्यात आले. मात्र, महिला कॉन्स्टेबल सध्या उन्नावच्या माखी पोलिस ठाण्यात तैनात आहे. या प्रकरणानंतर महिला कॉन्स्टेबलच्या पतीने तिला घटस्फोट दिला आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशSocial Viralसोशल व्हायरलPoliceपोलिसLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट