शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

कौटुंबिक कलह! पतीचा IPL तर पत्नीचा मालिका पाहण्यासाठी 'संघर्ष', रिमोटमुळे वाद चिघळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 19:10 IST

IPL 2024 News: सध्या आयपीएलच्या १७व्या हंगामाचा थरार रंगला आहे.

IPL 2024: आयपीएल म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी एक पर्वणीच... सध्या आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार रंगला आहे. यंदाचा हा हंगाम विविध कारणांनी चर्चेत आहे. अशातच उत्तर प्रदेशातील आग्रा येथून एक अनोखी घटना समोर आली. इथं आयपीएलचा सामना पाहण्यावरून पती-पत्नीमध्ये बिनसलं आहे. टीव्हीच्या रिमोटवरून दोघांमध्ये भांडण झालं. (Husband Wife IPL Match) खरं तर झालं असं की, पतीला आयपीएल तर पत्नीला मालिका पाहायची होती. पण, घरात एकच टीव्ही असल्यानं ते शक्य नव्हतं. (Agra Husband Wife Fight News) 

क्रिकेटचा चाहता असलेला पती दररोज आयपीएलचे सामने पाहत असत. मात्र पत्नीला मालिका पाहायची असल्यानं तिला ते खटकायचं. आपली आवडती मालिका पाहायला मिळत नसल्यानं पत्नीनं तक्रार करत रिमोट हिसकावला. यावरूनच दोघांमध्ये टोकाचं भांडण झालं. जे अखेर काउंसलरकडे जाऊन पोहोचलं. मग काउंसलरमधील अधिकाऱ्यांनी पती-पत्नीला कार्यालयात बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. 

असाही कौटुंबिक कलह! पत्नीनं आरोप केला की, पती रोज संध्याकाळी आयपीएल पाहण्यासाठी टीव्हीसमोर बसलेला असतो आणि रिमोट हातातच ठेवतो. पण, यावेळी मला आवडत्या मालिका पाहायच्या असतात. त्यासाठी मी रिमोट मागते मग त्यावरून भांडण होते. रोजच्या आयपीएल सामन्यांमुळं मी वैतागले असून यामुळे मालिका पाहता येत नाहीत. 

संबंधित पतीनं आरोप करत म्हटलं की, पत्नी नेहमीच मालिका पाहत असते पण आयपीएल वर्षातून एकदाच असते. त्यामुळे मी आयपीएलचे सामने पाहतो. काउंसलरच्या अधिकाऱ्यांनी दोघांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर त्यांची समजूत काढली. मालिका सुरू होताच पत्नीच्या हाती रिमोट सोपवण्याचा सल्ला देण्यात आला. तर, जेव्हा मालिका नसेल तेव्हा पतीला आयपीएल पाहू द्यावी, असं पत्नीला सांगण्यात आलं. मग तोडगा निघाल्यावर दोघेही घरी परतले.  

टॅग्स :IPLआयपीएल २०२४Uttar Pradeshउत्तर प्रदेशhusband and wifeपती- जोडीदार