शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

स्वत:ची मुलगी आणि पुतणीचा वापर करून लावायची हनीट्रॅप, अनेकांची केली शिकार,अखेर असं फुटलं बिंग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 13:38 IST

Crime News: पोलिसांनी हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवून पैसे उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. एका ३८ वर्षीय महिलेने तिची मुलगी आणि पुतणीच्या मदतीने कथितपणे ५ जणांना हनीट्रॅपची शिकार बनवले आहे.

उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा पोलिसांनी हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवून पैसे उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. एका ३८ वर्षीय महिलेने तिची मुलगी आणि पुतणीच्या मदतीने कथितपणे ५ जणांना हनीट्रॅपची शिकार बनवले असून, या माध्यमातून तिने गेल्या वर्षभरामध्ये सुमारे १० लाख रुपये उकळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

७ जानेवारी रोजी एका ४० वर्षीय व्यक्तीने सूरजपूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिल्यानंतर या टोळीचा भांडाफोड झाला आहे. या तक्रारीमध्ये जबरदस्तीने डिजिटल वॉलेटचा पासवर्ड घेतल्याचा आणि १.५ लाख रुपयांचा आरोप करण्यात आला होता.

याबाबत अतिरिक्त डीसीपी (सेंट्रल नोएडा) हिरदेश कठेरिया यांनी सांगितले की, आरोपी महिला ह्या पुरुष व्हॉट्सअॅप युझर्सना मेसेज पाठवून ऑनलाईन मात्री करायच्या. ओपन गृपच्या माध्यमातून या महिला फोन नंबर मिळवायच्या आणि त्यातून सावज हेरायच्या. जर कुणी त्यांच्या मेसेजला प्रतिसाद दिला तर त्या त्याला एखाद्या निर्जन ठिकाणी भेटण्यासाठी बोलवायच्या. जेव्हा हा माणूस तिथे यायचा तेव्हा मुख्य आरोपी कविता चौधरी तिचे दोन साथीदार असलेल्या फारुख आणि विष्णू यांच्यासोबत पोहोचायची. त्यानंतर या व्यक्तीवर लैंगिक शोषणाचा आरोप केला जायचा. जर अशा व्यक्तीने पैसे देण्यास नकार दिला तर त्याला बलात्काराच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली जायची. रविवारी नोएडातील एका खासगी कंपनीतील अधिकारी त्यांची पाचवी शिकार झाला. त्याने तक्रारीत सांगितले की, ७ जानेवारी रोजी एका महिलेने अनोळखी फोन नंबरवरून फोन केला. तिने तिचं नाव कविता असं सांगितलं. तसेच ग्रेटर नोएडामधील देवला गावामध्ये भेटण्यासाठी बोलावले.

पोलीस अधिकारी कठेरिया पुढे म्हणाले, तक्रारकर्त्यांने या घटनेबाबत माहिती देताना  सांगितले की, तो या महिलेला भेटण्यासाठी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास गेला. या महिलेला त्याच्या दुचाकीवर बसवले. तसेच या महिनेने सांगितलेल्या पत्त्यावर ते जाऊ लागले. तेवढ्यात मागाहून आलेल्या एका कारने त्यांना थांबवले. त्यातून दोन तरुण उतरले आणि त्यांनी पीडिताला मारहाण करण्यास सुरुवात केली.

या महिलेने आपल्यावर तिच्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपा केला. तर या दोन जणांनी त्याला मारहाण केली. त्यांनी आधी तक्रारकर्त्याकडे पैसे मागितले. तसेच डिजिटल वॉलेटचा पासवर्ड शेअर करण्यासही भाग पाडले. तसेच मोबाईल फोनही हिसकावून घेतला.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhoneytrapहनीट्रॅपUttar Pradeshउत्तर प्रदेश