शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या अधिकाऱ्याकडे २.६१ कोटींचे घबाड, इतर अधिकाऱ्यांची उडाली झोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 06:41 IST

Crime News: उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथील रेल्वेचे प्रधान मुख्य साहित्य व्यवस्थापक आणि १९८८ च्या बॅचचे इंडियन रेल्वे स्टोअर सर्व्हिस (आयआरएसएस) अधिकारी केसी जोशी यांना सीबीआयने अटक केली आहे. सीबीआयने त्यांना तीन लाखांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक केली

गोरखपूर : उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथील रेल्वेचे प्रधान मुख्य साहित्य व्यवस्थापक आणि १९८८ च्या बॅचचे इंडियन रेल्वे स्टोअर सर्व्हिस (आयआरएसएस) अधिकारी केसी जोशी यांना सीबीआयने अटक केली आहे. सीबीआयने त्यांना तीन लाखांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. अधिकाऱ्याच्या घरावर छापा टाकला असता त्यांच्या घरातून तब्बल २.६१ कोटी रुपये रोकड जप्त करण्यात आली आहे.

सीबीआयला छापेमारीत अनेक संशयास्पद कागदपत्रेही सापडली आहेत. त्यानंतर सीबीआयने त्याचा संगणक आणि हार्डडिस्क ताब्यात घेतली आहे. सीबीआयच्या चौकशीदरम्यान केसी जोशी यांनी अनेक धक्कादायक खुलासे करून रेल्वे अधिकाऱ्यांची झोप उडवली आहे. आरोपी के. सी. जोशी यांनी रेल्वेत सुरू असलेल्या लाचखोरीत इतरांचीही नावे घेतली आहेत.

कमिशनशिवाय कोणतेच काम नाही...रेल्वेमध्ये कोणतेही कंत्राट किंवा टेंडर कमिशनशिवाय होत नाही. ज्यात खालपासून वरपर्यंतच्या अधिकाऱ्यांचे कमिशन ठरलेले असते. कमिशन मिळाल्यानंतरच टेंडर आणि कंत्राट दिले जाते, असे त्यांनी सीबीआयला सांगितले आहे. त्यामुळे सीबीआय आता याप्रकरणी अन्य अधिकाऱ्यांची चौकशी करण्याच्या तयारीत आहे. यामुळे अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेCorruptionभ्रष्टाचारUttar Pradeshउत्तर प्रदेश