लखनौ - उत्तर प्रदेशातील ७२ गरीब कुटुंबांना त्यांच्या हक्काचं घर मिळाले आहे. राजधानी लखनौमध्ये प्राइम लोकेशन असणाऱ्या डालीबाग येथे हे फ्लॅट बनवण्यात आले आहेत. याठिकाणच्या कोट्यवधीच्या जमिनीवर माफियांची दहशत होती. जवळपास २ गुंठे जमीन मुख्तार अंसारीच्या अवैध ताब्यातून रिकामी करण्यात आली होती. याच जमिनीवर गरीब कुटुंबासाठी फ्लॅट बनवण्यात आले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते या लाभार्थ्यांना त्यांच्या स्वप्नातील घरांची चावी सोपवण्यात आली आहे.
अवघ्या ११ लाखांत मिळाला कोट्यवधीचा फ्लॅट
लखनौच्या डालीबाग येथे माफिया मुख्तार अंसारीने अवैध कब्जा केलेली जमीन रिकामी करून त्याठिकाणी लखनौ विकास प्राधिकरणाने सरदार वल्लभभाई पटेल निवास योजना राबवली. या योजनेतून ग्राऊंड प्लस ३ अशा इमारती उभारण्यात आल्या. त्यात एकूण ७२ फ्लॅट बनले. या प्राइम लोकेशनवर बनलेल्या या फ्लॅटची बाजारभावानुसार किंमत १ कोटीच्या आसपास आहे. परंतु आर्थिक कमकुवत असणाऱ्या EWS कॅटेगिरीतील लोकांना ही घरे केवळ १० लाख ७० हजारांत देण्यात आली आहेत.
काय आहे वैशिष्टे?
हा प्रकल्प २० मीटर लांबीच्या रोड शेजारी आहे. शहराची शान असलेला १०९० चौक, हजरतगंज चौक इथून केवळ ५ ते १० मिनिटांच्या अंतरावर आहे. या प्रकल्पातून लाभार्थी कुटुंबाला फ्लॅटमध्ये स्वच्छ पाणी, वीज, सुरक्षा व्यवस्था आणि दुचाकी वाहनांसाठी पर्यायी पार्किंग सुविधा देण्यात आली आहे. त्याशिवाय पार्कचेही बांधकाम होणार आहे.
दरम्यान, या योजनेतून ज्या ७२ कुटुंबांना घरे मिळाली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आहेत. तर ज्यांना घरे मिळाली ते आता सन्मानाचं आयुष्य जगू शकतात. ही केवळ सुरुवात आहे, हे अभियान संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात राबवले जाईल. जेणेकरून गरीब आणि गरजू लोकांना त्यांना हक्काची घरे मिळतील असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.
Web Summary : 72 poor families in Lucknow received homes in a prime location, thanks to land reclaimed from mafia. These EWS flats, worth crores, were allocated for just ₹11 lakhs. CM Yogi handed over keys.
Web Summary : लखनऊ में 72 गरीब परिवारों को माफिया से मुक्त कराई गई जमीन पर घर मिले। करोड़ों के ईडब्ल्यूएस फ्लैट केवल 11 लाख में आवंटित। सीएम योगी ने चाबियां सौंपी।