Square beautification resolution painting unveiled | चौक सुशोभिकरण संकल्प चित्राचे अनावरण

चौक सुशोभिकरण संकल्प चित्राचे अनावरण

तुळजापूर : शहर विकास प्राधिकरणअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक सुशोभिकरण कामाच्या संकल्प चित्राचे अनावरण सोमवारी येथील नगर परिषद कार्यालयात करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, नगरसेवक विजय कंदले, किशोर साठे, औदुंबर कदम, तानाजी कदम, संगीता कदम उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासाठी एक कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच सदरील पुर्णाकृती पुतळ्याबाबतच्या सर्व मंजुऱ्यादेखील मिळाल्या असल्याचे नगराध्यक्ष रोचकरी यांनी सांगितले. प्राधिकरणाच्या येणाऱ्या बैठकीत सदरील प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. त्यांच्या मंजुरीनंतर वाढीव रकमेच्या मंजुरीसाठी सदरील प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असून, तेथून मंजुरी आल्यानंतर सदरील प्रस्तावाची निविदा काढून प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल, असेही रोचकरी म्हणाले.

Web Title: Square beautification resolution painting unveiled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.