राेहित्रातील साडेतीन लाखांचे तेल, काॅईल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:32 AM2021-03-05T04:32:40+5:302021-03-05T04:32:40+5:30

उस्मानाबाद : घरफाेड्यांसाेबतच आता चाेरट्यांनी आपला माेर्चा राेहित्रांकडेही वळविला आहे. उस्मानाबाद तालुक्यातील जहागीरदारवाडी येथील खडी केंद्राच्या विद्युत राेहित्रातील तेल ...

Oil of Rs | राेहित्रातील साडेतीन लाखांचे तेल, काॅईल लंपास

राेहित्रातील साडेतीन लाखांचे तेल, काॅईल लंपास

googlenewsNext

उस्मानाबाद : घरफाेड्यांसाेबतच आता चाेरट्यांनी आपला माेर्चा राेहित्रांकडेही वळविला आहे. उस्मानाबाद तालुक्यातील जहागीरदारवाडी येथील खडी केंद्राच्या विद्युत राेहित्रातील तेल तसेच ताब्यांच्या तारांचे काॅईल व इतर साहित्य मिळून सुमारे ३ लाख ४० हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना १ ते २ मार्च या कालावधीत घडली. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध ग्रामीण ठाण्यात गुन्हा नाेंद करण्यात आला आहे.

याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, जहागीरदारवाडी येथील श्रीराम व्यंकटराव देशमुख यांचे गावातील गट क्र. ८७ मध्ये खडी केंद्र आहे. या केंद्रासाठी स्वतंत्र विद्युत राेहित्र बसविण्यात आले आहे. आजूबाजूला काेणीही नसल्याची संधी साधत अज्ञात चाेरट्यांनी राेहित्रातील तेल, तांब्याच्या तारेचे काॅईल व इतर साहित्य असा एकूण सुमारे ३ लाख ४० हजारांचा ऐवज अज्ञाताने लंपास केला. ही घटना साधारपणे १ ते २ मार्च या कालावधीत घडली. ही घटना उघडकीस येताच ३ मार्च राेजी देशमुख यांचे नातेवाईक सुहास भगवानराव माेरे यांनी उस्मानाबाद ग्रामीण पाेलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून अज्ञाताविरुद्ध भादंसंचे कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

Web Title: Oil of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.