राम मंदिरासाठी सव्वा कोटींवर निधीचे संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:37 AM2021-03-01T04:37:39+5:302021-03-01T04:37:39+5:30

उस्मानाबाद : उत्तर प्रदेशातील आयोध्यामध्ये श्री राम मंदिर बांधकामासाठी सर्वत्र निधी संकलनाचे काम हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये १५ ...

Fundraising for Rs | राम मंदिरासाठी सव्वा कोटींवर निधीचे संकलन

राम मंदिरासाठी सव्वा कोटींवर निधीचे संकलन

googlenewsNext

उस्मानाबाद : उत्तर प्रदेशातील आयोध्यामध्ये श्री राम मंदिर बांधकामासाठी सर्वत्र निधी संकलनाचे काम हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत १ कोटी ३६ लाख ८४ हजार ४५ रुपये निधी जमा झाला असल्याची माहिती श्री राम जन्मभूमी निर्माण निधी संकलन समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत रविवारी सांगितली.

श्री राम जन्मभूमी निर्माण निधी संकलन समितीच्या वतीने रविवारी शहरात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी समितीचे जिल्हाध्यक्ष महंत तुकोजीबुवा यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले, जिल्ह्यामध्ये श्रीराम जन्मभूमी निर्माण संकलन अभियानाच्या माध्यमातून ७८४ गावांना संपर्क साधला. यातील ४५५ गावांतील १०० टक्के संकलनाचे काम पूर्ण झाले आहे. अभियानांतर्गत १ लाख ७८ हजार ९८ कुटुंबांशी प्रत्येक्ष संपर्क झाला असल्याचे ते म्हणाले. निधी संकलनासाठी ६ हजार २२२ पुरुष व १ हजार ९२ महिला अशा एकूण ७ हजार ३१४ कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आहे. २७० राम फेरी, ४७ मंडळ समित्या व ५७३ ग्राम समित्यांची स्थापना करण्यात आली आहे, तर १३ सद्भाव बैठका घेण्यात आल्या. २८ महिलांच्या बैठका व २३ श्रेणी बैठका पार पडल्या आहेत. त्याबरोबरच ग्राम स्तरावर ५७३ बैठका झाल्या असून, तालुका स्तरावर ५१ अशा ५८८ बैठका घेण्यात आल्या. हे कार्य करण्यासाठी समाज माध्यमावर ८२ ग्रुप तयार करण्यात आल्याचे ते म्हणाले. यावेळी अभियान प्रमुख श्रीकृष्ण धर्माधिकारी, सहप्रमुख विजय वाघमारे, श्रीराम पुजारी, विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय चौरे, रास्वसंचे अध्यक्ष अनिल यादव, प्रांत पालक डॉ.सुभाष जोशी, शेषाद्री डांगे आदी उपस्थित होते.

Web Title: Fundraising for Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.