मांजरा नदीला पूर, पाणी लगतच्या शेतात घुसले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 01:18 PM2021-09-06T13:18:11+5:302021-09-06T13:21:33+5:30

मागील दिन दिवसात वाशी तसेच भूम तालुक्यास पावसाने झोडपून काढले आहे.

flood in Manjara river, water seeps into nearby fields! | मांजरा नदीला पूर, पाणी लगतच्या शेतात घुसले !

मांजरा नदीला पूर, पाणी लगतच्या शेतात घुसले !

googlenewsNext
ठळक मुद्देस्मशानभूमी पाण्याखालीसंगमेश्वर प्रकल्पही ओव्हर फ्लो

पारगाव/ ईट (जि. उस्मानाबाद) : वाशी तालुक्यातील  पारगावसह परिसरात शनिवारी तसेच रविवारी मांजरा नदीच्या उगम क्षेत्रात रात्रभर दमदार पाऊस झाला. त्यामुळे मांजरा नदीला पूर आला आहे. सातत्याने पाणी पातळीत वाढ होते आहे. हे पाणी आता लगतच्या शेतीत घुसले आहे. संगमेश्वर प्रकल्पही ओव्हर फ्लो झाला आहे.

मागील दिन दिवसात वाशी तसेच भूम तालुक्यास पावसाने झोडपून काढले आहे. पावसामुळे संगमेश्वर प्रकल्प रविवारी रात्री ओव्हर फ्लो झाला. त्यामुळे मांजर नदीपात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे हे नदीपात्र सकाळपासूनच दुथडी भरून वाहू लागले आहे. पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने हे पाणी लगतच्या शेतात घुसले आहे. त्यामुळे शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. पाणी अत्यंत वेगाने वाहत असल्याने जनकापूर-मानेवाडी रस्त्यावरील पूल वाहून गेला. पारगाव येथील स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Web Title: flood in Manjara river, water seeps into nearby fields!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.