- बाळासाहेब स्वामी
ईट (जि. उस्मानाबाद) : ईट येथील एका ६० वर्षीय वृद्धाच्या डाेक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजता उघडकीस आली हाेती. यानंतर पाेलिसांनी तपासाची चक्रे फिरवून अवघ्या बारा तासांत आराेपीस बेड्या ठाेकल्या. याप्रकरणी एकाविरुद्ध वाशी पाेलीस ठाण्यात कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूम तालुक्यातील ईट गावाला लागून जाणाऱ्या आंदरूड रस्त्यालगत आमराई आहे. याच आमराईमध्ये २२ जानेवारीच्या सायंकाळी ईट येथील विठ्ठल साेनबा चव्हाण (वय ६०) यांचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर ईटसह परिसरात खळबळ उडाली हाेती. ही घटना वाशी पाेलीस ठाण्यासह पाेलीस अधीक्षक कार्यालयाला समजताच जिल्हा पाेलीस अधीक्षक राज तिलक राैशन, उपविभागीय पाेलीस अधिकारी विशाल खांबे, वाशी ठाण्याचे पाे. नि. उस्मान शेख यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथक तसेच ठसे तज्ज्ञांना पाचारण करून तपासाला गती दिली.
यानंतर अवघ्या बारा तासांत ईट येथील दत्तात्रय लिमकर यांच्याकडे सालगडी असलेल्या आरिफ निसार साैदागर (२१, रा. वेताळ गल्ली, तुळजापूर, ह.मु.ईट) यास संशयावरून ताब्यात घेण्यात आले. ‘मयत विठ्ठल चव्हाण हे दारू पिऊन आपणाला शिव्या देत हाेते. याच रागातून त्यांचा खून केला,’ अशी कबुली साैदागर याने दिल्यानंतर पाेलिसांनी त्यास अटक केली. याप्रकरणी वाशी पाेलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास पाे. हे.काॅ. एस. सी. घाेळसगाव, गाेरख टकले, अच्युत कुटे, अशाेक करवर करीत आहेत.
Web Title: Extreme steps taken by drinking and swearing; The old man's killer was handcuffed in 12 hours
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.