दोन दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा मृतदेह तलावात सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 07:54 PM2020-03-27T19:54:36+5:302020-03-27T19:55:44+5:30

दोन दिवसांपासून तरुण बेपत्ता होता

The body of the missing youth was found in the lake for two days | दोन दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा मृतदेह तलावात सापडला

दोन दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा मृतदेह तलावात सापडला

googlenewsNext

लोहारा (जि.उस्मानाबाद) : गेले दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या तरूणाचा मृतदेह शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळील गाव तलावात शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास आढळून आला आहे. 

 लोहारा शहरातील सुशिल कोंडीबा रोडगे (वय ३६) असे मयत तरूणाचे नाव आहे. रोडगे हा गेल्या दोन दिवसापासून शहरातून बेपत्ता झाला होता. याबाबत लोहारा पोलिसांत त्याच्या वडिलांनी मिसींग दाखक केली होती. बराच शोध घेवूनही तो मिळून आला नव्हता. शुक्रवारी सकाळी काही मुले शहरातील तलावा जवळ खेळत होती. यावेळी तलावात मृतदेह तरंगत असल्याचे मुलांना दिसले. त्यांनी विजय ढगे यांना सांगितले. त्यानंतर विजय ढगे यांनी तत्काळ पोलिस ठाण्यात याबाबत माहिती दिल्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक चौरे,पोकॉ एम.एस.जगताप, के. आर.शेवाळे, बी.यु.झिंगाडे, अविनाश जाधव, संजय हलसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाण्यात तरंगणारा मृतदेह बाहेर काढल्यानंतर मृताची ओळख पटली. दुपारी ग्रामीण रूग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर मयत तरूण सुशिल रोडगे यांच्यावर सार्वजनिक समस्शानभुमित अंत्यसंस्कार करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांत आकस्मित मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोकॉ बी.यु.झिंगाडे करीत आहेत.

Web Title: The body of the missing youth was found in the lake for two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.