वर्क फ्रॉम होम कळलं पण ऑनलाईन मिटींग्स कशा घेतात?अनघा कित्तुरे, लातूर ऑनलाईन मिटिंग दोन प्रकारे घेतल्या जातात. एक म्हणजे फक्त ऑडिओ. ज्यात एकाच वेळी अनेक जण एकमेकांशी बोलत असतात, एकमेकांना ऐकत असतात. यात ते एकमेकांना दिसत नाहीत. दुसरा प्रकार म्हणजे व्हिडीओ. यात एकाचवेळी अनेक जण ऑनलाईन येतात आणि एकमेकांशी बोलतात. या प्रकारच्या मिटिंग्जमध्ये सगळे सगळ्यांना दिसतात, त्यांचे आवाज ही ऐकू येतात. तुम्हाला सगळ्यांना व्हॉट्स अप तर माहीतच आहे. व्हॉट्स अप वरून हे दोन्ही प्रकार करता येतात. फक्त व्हॉट्स अप ची मर्यादा सध्यातरी 4 माणसांची आहे. म्हणजे 5 लोकांना एकाच वेळी ऑनलाईन मिटिंग करायची असेल तर करता येत नाही. पण गुगल डुओ, झूम, स्काईप अशा अजूनही अनेक वेबसाइट्स आणि अँप्स आहेत ज्यांच्या माध्यमातून एकाच वेळी अनेक जण ऑनलाईन मिटिंग करू शकतात.
हे वर्क फ्रॉम होम -ऑनलाइन मीटिंग काय असतं ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 06:50 IST
हल्ली रोज आईला नाहीतर बाबाला ऑनलाईन मिटिंग अटेंड करायची असते, हे कसं करतात?
हे वर्क फ्रॉम होम -ऑनलाइन मीटिंग काय असतं ?
ठळक मुद्देआता सगळेच घरात आहेत, पण कामे अडून चालणार नाही,.