तुम्ही आजवर कधी इमर्जन्सी या शब्दाचा विचार केलाय का? इमर्जन्सी म्हणजे काय? ती कधी येऊ शकते? कोणावर येऊ शकते? कारण इमर्जन्सी म्हणजे अचानक उद्भवणारी गंभीर परिस्थिती. ती कधीही, कुठेही आणि कोणावरही येऊ शकते. ती आधी सांगून येत नाही म्हणूनच त्याला इमर्जन्सी म्हणतात. तर अशी काय काय गंभीर परिस्थिती आपल्यावर ओढवू शकते याचा तुम्ही कधी विचार केलाय का?म्हणजे आईबाबांबरोबर ट्रेनने जात असतांना आपण चुकून एकटेच मागे राहून गेलो तर? किंवा आपण आणि आपले आजोबा असे दोघंच घरात असतांना त्यांना अचानक काही व्हायला लागलं तर? किंवा आपण सायकलवरून एकटे क्लासहून येतो. त्यात जर येतांना अंधार झाला आणि त्याच वेळी सायकल पंक्चर झाली तर? असे काय वाट्टेल ते प्रसंग आपल्यावर केव्हाही न सांगता येऊ शकतात. आणि ते प्रसंग आल्यानंतर त्याबद्दल विचार करून मग काही कृती करायला काही वेळ नसतो. मात्र असं काही तरी घडू शकतं याचा जर आपण आधीच विचार केलेला असेल, तर आपल्याला त्या संकटातून काहीतरी चांगला मार्ग काढता येऊ शकतो.
इमर्जन्सी म्हणजे काय? ती कधीही, कुठेही आणि कोणावरही येऊ शकते..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 16:11 IST
तुम्ही आजवर कधी इमर्जन्सी या शब्दाचा विचार केलाय का? इमर्जन्सी म्हणजे काय? ती कधी येऊ शकते? कोणावर येऊ शकते? ...
इमर्जन्सी म्हणजे काय? ती कधीही, कुठेही आणि कोणावरही येऊ शकते..
ठळक मुद्देएक यादी बनवून घरातल्या भिंतीवर ती चिकटवून ठेवणं ..