watch this, तुम्हाला व्हेल माशाने गिळले तर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 18:09 IST2020-04-07T18:04:22+5:302020-04-07T18:09:52+5:30
यू-टय़ूबवर नुसताच टाइमपास करायचा तर तो इन्फर्मेटिव्ह टाइमपास करायला काय हरकत आहे नाही का?

watch this, तुम्हाला व्हेल माशाने गिळले तर?
समजा, जगभर फक्त पाच सेकंदासाठी ऑक्सिजन संपला तर?
समजा, तुम्हाला व्हेल माशाने गिळले तर? समजा, परग्रहावरचे जीव पृथ्वीवर आले तर? समजा, आपण झोपलोच नाही तर? असे अनेक प्रश्न तुम्हालाही पडत असतील ना? आता विचार करा हा, समजा आपण सगळी माणसं एकाच दिवशी पृथ्वीवरून गायब झालो तर? काय होऊ शकेल? भारी विषय आहेत ना! विचार करायला भरपूर खाद्य. आणि फँटसी. जी आपल्याला आवडतेच. जगभर कच:याचे साम्राज्य आले तर? माणूस पाणी प्यायचाच विसरला तर? काय काय होईल याचा तुम्ही कधी विचार केलाय का?
मग आता यावर नुसता विचार करू नका तर What If हे यू-टय़ूब चॅनल बघा. त्यात अशाच काही भन्नाट
प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आहे. हे चॅनल्स इंग्रजीत असले तरी त्याला सबटायटल्स असतात. त्यामुळे समजायला सोपं जाऊ शकतं.
यू-टय़ूबवर नुसताच टाइमपास करायचा तर तो इन्फर्मेटिव्ह टाइमपास करायला काय हरकत आहे नाही का?
इथे जायचं कसं? यू-टय़ूबवर जाऊन What If का असं सर्च करा. आणि भरपूर व्हिडीओज बघा.