एकापेक्षा दोन हलके ! हे कसं शक्य आहे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 11:17 IST2020-05-07T11:16:10+5:302020-05-07T11:17:16+5:30
एका अगदी साध्या प्रयोगाने हे तुम्हाला सिध्द करता येईल.

एकापेक्षा दोन हलके ! हे कसं शक्य आहे ?
ठळक मुद्देघराला बनवा तुमची प्रयोगशाळा
- मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग
साहित्य
दोन सारख्या आकाराच्या उभट डब्या झाकणासह, वाळू, एक व्यक्ती
कृती
1. पूर्वतयारी - दोन डब्या घ्या.
2. एका डबीत जास्तीत जास्त वाळू भरा. झाकण लावा.
3. आता प्रयोगाला सुरूवात करा.
4. एका व्यक्तीला तळहात पुढे करून उभे करा.
5. त्या तळहातावर भरलेली डबी ठेवा. हातावर पडलेला भार अनुभवायला सांगा.
6. दुसरी डबी पहिल्या डबीवर ठेवा.
7 - समोरच्या व्यक्तिला दोन्ही डब्या एकमेकींवर ठेवल्यावर भार कमी जाणवतो.
असे का होते?
1. दुसरी डबी ठेवली जात असताना तळहाताचे स्नायू दुप्पट भार सहन करण्याची तयारी करतात पण भार फार वाढत नाही त्यामुळे तो कमी झाल्यासारखा वाटतो.