try this easy chocolate mug cake resipi | kill   कंटाळा - चॉकलेट केक करताय? ही घ्या कपात  केक  करण्याची इझी  रेसिपी !

kill   कंटाळा - चॉकलेट केक करताय? ही घ्या कपात  केक  करण्याची इझी  रेसिपी !

ठळक मुद्देथोडा थंड झाला की मग बाहेर काढा आणि सगळ्यांना खायला द्या.

तुम्हाला पदार्थ बनवायला आवडतं? कधीतरी पोळी लाटून द्यावी, अंड फेटून द्यावं वाटतच ना? पण आईबाबा गॅसपाशी जाऊच देत नाहीत. जाऊ देत, नो प्रॉब्लेम! आता मायक्रोवेव्ह वापरूनही तुम्ही एखादा झक्कास पदार्थ सहज बनवू शकता. घरी असल्याने खा खा होतेच. मग सारखं आईच्या मागे लागून तिचं डोकं खाण्यापेक्षा स्वत:च एखादा पदार्थ करून तिला खाऊ घातला तर?

चहा कॉफी आणि दुधाबरोबर चॉकलेट केक मस्त लागेल. तो तुम्ही तुमच्या आवडत्या कपात आणि मायक्रोवेव्हमध्ये सहज बनवू शकता.

काय काय लागेल?

2 चमचे मैदा, 3 चमचे कंडेन्स मिल्क, 2 चमचे कोको पावडर,  छोटा चमचा बेकिंग पावडर, चिमूटभर बेकिंग सोडा, 1 ते दीड चमचा पातळ बटर, 2 चमचे दूध आणि आवडत असेल तर हवी ती ड्रायफ्रुट्स बारीक करून.

 कसं कराल?

मोठा मग घ्या. त्यात मैदा, कोको पावडर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा घाला. चमच्याने छान हलवा. त्यात दूध, बटर, कंडेन्स मिल्क, घाला.

चांगलं एकत्र करा. गुठळी होता कामा नये. त्यात ड्राय फ्रुट घालून हलवा. मायक्रोव्हेव हायेस्ट टेम्परेचरवर ठेवा.

900 वर. आणि 2 मिनिट मायक्रोव्हेव करा. तुमचा चॉकलेट मग केक तयार. थोडा थंड झाला की मग बाहेर काढा आणि सगळ्यांना खायला द्या.

आवश्यक सूचना

 मग घेताना तो मायक्रोव्हेवसाठी चालणारा घ्या. आणि जो चमचा बॅटर एकत्र करण्यासाठी वापराल, तो मायक्रोव्हेवमध्ये मग ठेवण्याआधी बाजूला बाहेरच ठेवा.

 

 

Web Title: try this easy chocolate mug cake resipi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.