सुपर फुगा, बनवा घरच्या घरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 07:00 IST2020-05-22T07:00:00+5:302020-05-22T07:00:07+5:30
दुपारी सगळे झोपल्यावर करायचे धमाल उद्योग

सुपर फुगा, बनवा घरच्या घरी!
आपण वाढदिवसाला कितीतरी फुगे फुगवतो आणि मग ते पायाने, हाताने फोडण्याचा खेळ खेळतो. पण आपले फुगे बॉलसारखे बाऊन्सी असतात का? तर नाही. पण आज आपण बाऊन्सी फुगा बनवणार आहोत.
साहित्य:
मोठा फुगा, जाड सेलोटेप.
कृती:
1) फुगा व्यवस्थित फुगवून घ्या. आणि तोंडाशी गाठ मारून टाका.
2) हाताने फुग्याचीच गाठ मारता येत नसेल तर त्यासाठी दोरा वापरा.
3) आता फुगलेला फुगा बॉल सारखा बाउन्स करून बघा होणार नाही.
4) आता सेलोटेप घेऊन फुग्याच्या दोन्ही बाजूंना अधिक च्या चिन्हासारख्या सेलोटेप्स चिकटवा.
5) फुग्याच्या पृष्ठभागावर वरून खालून चार बोटं सोडून या अधिकच्या खुणोत सेलोटेप लावा.
6) आणि आता गम्मत बघा तुमचा फुगा बाउंस व्हायला सुरुवात होईल.
7) तुमचा साधा फुगा, सुपर फुगा बनेल. मग बॉल सारखा तुम्ही फुगा घेऊन बाऊन्सिंगचा खेळ खेळू शकता.