लाऊडस्पीकर लावून  शाळेचा अभ्यास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 07:30 AM2020-05-22T07:30:00+5:302020-05-22T07:30:02+5:30

onlineशाळा म्हणजे असतं तरी काय?

study with loudspeakers- online egucation | लाऊडस्पीकर लावून  शाळेचा अभ्यास 

लाऊडस्पीकर लावून  शाळेचा अभ्यास 

Next
ठळक मुद्देशाळेत न जाता घरी बसून ऑनलाईन शिकता येत का?

 बाकी सगळ्यांच्या शाळा बंद आहेत, पण आजही त्यांची शाळा मात्र सुरूच आहे. ते शिक्षक रोज शाळेत येतात.पण शाळेत मुले नसतातच. मुले आपापल्या घरी असतात. मग ते शिक्षक ग्रामपंचायत मध्ये बसवलेला स्पीकर सुरु करतात आणि सुरु होतो शाळेचा परिपाठ. या स्पीकरवर राष्ट्रगीत वाजवले जाते आणि बोधकथा देखील सांगितली जाते. दुपारी जेवणाच्या वेळी बडबड गीते देखील वाजवली जातात . 
.. किती भारीय न हे ! 
 ग्रामपंचायतमधील  या स्पीकरचा आवाज गावातील प्रत्येक घरात ऐकू जाईल याची व्यवस्था ग्रामपंचायतीने केली आहे.  रोज काय शिकवणार याची घोषणा आदल्या दिवशी रात्री केली जाते. वर्कशीट ची झेरॉक्स  मुलांना आदल्या दिवशी दिली जाते. आणि मग रोज सकाळी 9 ते 1 या वेळेत ही शाळा भरते. घनशाम भाई नावाचे हे शिक्षक गुजरात मधील कच्छ जिल्ह्यातील जनान गावातील सरकारी शाळेतील मुलांना शिकवण्याचे काम करतात.भारत-पाकिस्तान सीमेवर हे गाव आहे.  काही जण मला विचारात होते कि, तुम्ही  ऑनलाईन शाळा भरवू शकता कारण तुमच्या शाळेतील प्रत्येक मुलाकडे स्मार्ट फोन आहे. पण आमच्याकडे नाहीये, मग आम्ही कसे जाणार ऑनलाईन शाळेत?  
- पण म्हणतात न कि इच्छा असली कि मार्ग सापडतोच. घनशाम भाई यांनी किती सोपा पर्याय वापरून शाळा सुरूच ठेवलीय. यासाठी ना इंटरनेट गरजेचं  ना स्मार्ट फोन.  
मुलांनो, एक लक्षात घ्या शिकण्यासाठी साधनांपेक्षा शिकण्याची मानसिकता महत्वाची आहे.मग आहात ना तुम्ही तयार ऑनलाईन शाळेत जायला? 
 

Web Title: study with loudspeakers- online egucation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.