Make an ice qubes at home, stay at home activity | घरच्या घरी बर्फाचा  गोळा  बनवा , गोळा  तोच  आकार  नवा 

घरच्या घरी बर्फाचा  गोळा  बनवा , गोळा  तोच  आकार  नवा 

ठळक मुद्देदुपारी सगळे झोपल्यावर करायचे धमाल उद्योग

उन्हाळ्यात बर्फाचा गोळा खायला कसली धमाल येते. पण सध्या बाहेर जाता येत नाहीये आणि बाहेरचं काही खाणं हा तर प्रश्नच नाहीये. मग बर्फार्चा गोळा खाणार कसा? आता बर्फाचा गोळा नाही पण, बर्फाच्या क्यूब्जचा आनंद तुम्ही नक्की घेऊ शकता. 
साहित्य: 
आईस ट्रे, पाणी, सरबताचे चार फ्लेवर्स 
कृती: 
1) तुमच्या आईस ट्रे मध्ये किती क्यूब्जची जागा आहे ती मोजा. त्यानुसार किती फ्लेवर्स करायचे आहेत हे ठरवा. 
2) ऑरेंज फ्लेवरचे आईस क्यूब्ज बनवण्यासाठी एका भांड्यात ग्लासभर पाणी घ्या, त्यात ऑरेंज फ्लेवर, साखर, मीठ घालून सरबत तयार करा. काही सरबतं रेडिमेड मिळतात, त्यात फक्त पाणी घालायचं असतं ती वापरली तरी चालतील. 
3) आता अलगद आईस ट्रे मधले काही ब्लॉक्स ऑरेंज सरबताने भरा. 
4) अशीच क्रिया तुम्ही मँगो, लेमन, कोला किंवा इतर तुमच्या आवडीच्या सरबतांसाठी करा. 
5) संपूर्ण ट्रे भरला कि फ्रिजरमध्ये ठेऊन द्या. 


6) चार तासांनी ट्रे चेक करा. सरबत पूर्ण गोठलेलं असेल तर ट्रे उलटा करा आणि मस्त फ्लेवर्ड आईस क्यूब खा. 
7) घरच्या घरी केलेले असल्याने हे बर्फाचे गोळे खाण्यापासून कुणीही तुम्हाला रोखणार नाही. 

Web Title: Make an ice qubes at home, stay at home activity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.