व्हिडीओ कॉलवर बोलताना तुम्ही 'ब्लँक ' होता ? TRY THIS
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 19:24 IST2020-04-10T19:16:46+5:302020-04-10T19:24:19+5:30
तुमच्या मित्रांशी कॉन-कॉलवर बोलताय? तेव्हा काय करायचं असतं नेमकं?

व्हिडीओ कॉलवर बोलताना तुम्ही 'ब्लँक ' होता ? TRY THIS
- पार्थ नाशिककर
फार बोलतात हे मोठे लोक. त्यातही माझी आई. तिने झूम, गुगल ड्यूओ असे अँप डाउनलोड केले आहेत. आणि तिच्या खूप फ्रेंड्स तिथं तासतासभर गप्पा मारतात. खिदळतात, खुश होतात. इतकं बोलतात रोज.
मग मी आई ला सांगितलं की माङया मित्रंचा पण असा कॉल लावून दे. आई ने मग माङया मित्रंच्या-मैत्रिणीच्या आयांचा ग्रुप केला. आणि आम्ही सगळे कानात इअर फोन लावून बसलो बोलायला.. पण ट्या ट्या फीस!! आम्हाला काही बोलताच येईना
कसा आहेस, कशी आहे विचारून झालं, जेवण काय केलं विचारलं पण बाकी काय बोलणार?
मग चिडचिड झाली, अरे बोल ना, बोला ना झालं .. पण कुणी काही बोलेना
मला रडूच आलं, एरवी शाळेत किती बोलतो आम्ही पण मग आता काही नाही का बोलता येत?
मित्रंना पाहुन त्यांची जास्तच आठवण यायला लागली.
आई च्या मैत्रिणी किती हसतात, मग आम्ही का नाही हसलो?
मी आई ला विचारलं, तर तिने जे मला सांगितलं ते तुम्हाला सांगतोय
म्हणजे आपला कॉन कॉल फसणार नाही
- आई म्हणाली एवढं कर
मग बाकी पुढचं सुचेल. आणि मग गप्पा रंगतील
हे आम्ही करतोय आता
तर इतकी भारी ऑनलाइन पार्टी झाली की आई ने शेवटी मला वाय फाय बंद करण्याची धमकी दिली
मज्जा!
कॉनकॉलवर बोलताना.
1. एकतर आपण काय बोलणार याचा आधी मनाशी विचार, म्हणजे लिस्ट करायची, अजेंडा फिक्स करायचा कॉल चा
2.दिवसभर काय काय केलं हे एकेकाने सांगायचं
3. वस्तू, गावं , फुलं फळं यांच्या भेंड्या खेळयाच्या
4. सगळ्यानी मिळून एक गाणं म्हणायचं
5. मेमरी गेम खेळायचा म्हणजे कुणी शब्द विसरला की खूप हसू येतं
6.हास्य क्लब चे आजी आजोबा हसतात तसं खूप हसायचं, उगीच