मस्त डिझाइन काढायची का नखांवर, करू इझी नेल आर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 14:42 IST2020-05-15T14:39:13+5:302020-05-15T14:42:07+5:30
कोण म्हणतं, की नेल आर्ट घरच्या घरी करता नाही येत म्हणून

मस्त डिझाइन काढायची का नखांवर, करू इझी नेल आर्ट
नेलपेंट लावायला कुठल्या मुलीला आवडत नाही. पण नेल आर्ट म्हटलं की काहीतरी खूपच अवघड असेल असं वाटतं ना? मग एक सोप्पी ट्रिक आज बघूया.
साहित्य:
नेलपेंट, सेलो टेप.
कृती:
1) तुमच्याकडे बारीक सेलोटेप असेल तर उत्तम नसेल तर ज्या कुठल्या साईजची असेल त्याच्या अगदी बारीक म्हणजे पट्ट्या कापून घ्या.
2) आता नखांवर कुठलही डार्क शेडचं नेलपेंट लावा.
3) ते वाळल्यावर नखांवर कापलेल्या सेलोटेप्स आडव्या चिकटवा.
3) त्यांची दोन्ही बाजूंची टोकं बोटावर चिकटवायला हवीत.
4) आता तुमच्या आवडीचं लाईट कलरचं नेलपेंट त्यावर लावा.
5) हा दुसरा रंगही व्यवस्थित वाळू द्या.
6) मग हळूच सेलोटेप्स काढून घ्या.
7) डार्क आणि लाईट शेड्सचं मस्त डिझाईन तुमच्या नखांवर तयार झालेलं असेल.