तुम्हाला माहितेय, जेव्हापासून माणसं लॉक डाऊन होऊन घरात बसली आहेत, तेव्हापासून प्राण्यांचा वावर मुक्तपणो व्हायला सुरुवात झाली आहे. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात रस्त्यांवरून मोर फिरायला लागले आहेत. तळ्यांमध्ये, नद्यांमध्ये बदकं निवांत पोहू लागली आहेत. इतकंच नाही तर जगभरात जिथे जिथे माणसाने प्राण्यांच्या जमिनीवर अतिक्रमण केलं होतं तिथे सगळीकडे आता प्राणी परतून आले आहेत. समुद्रात जहाजांची ये जा थांबल्यामुळे अनेक मासे जे एरवी खोल समुद्रात लपलेले असतात आता वर येऊन मस्त पोहोत आहेत. तुम्हाला जर याचे व्हिडीओ बघायचे असतील तर युट्युबवर खूप आहेत. तुम्ही बघू शकता. या लॉक डाऊनमध्ये सारखं किती चित्र काढणार नाहीतर विज्ञान प्रयोग करणार ना?म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन येत आहोत, व्हर्च्युअ ल जंगल सफारी. म्हणजे काय?
****
ताडोबाला जायचंय?1. ताडोबाची व्हचरुअल टूर वेबसाईटवर लाईव्ह पाहाता येते : वेबसाईट - www.mytadoba.org2. यूट्यूबवर पाहायची असेल तर यूट्यूबवर जा, सर्च वर्ड द्या tadoba safari 3. वेळ: दुपारी 3 वाजता
दक्षिण आफिकेला जायचंय?1. क्रुगर राष्ट्रीय उद्यान, दक्षिण आफ्रिका यांची लाईव्ह सफारी बघण्यासाठी यूट्यूबवर जा.2. सर्च वर्ड द्या kruger national park live safariवेळ: सकाळी 9.30 आणि संध्याकाळी 7