आईला द्यायचं का एक भन्नाट सरप्राईझ ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 12:35 IST2020-04-17T12:32:28+5:302020-04-17T12:35:59+5:30
करा की जरा आईला पण खुष..काय? आणि तेही एकदम सोप्पं तर आहे!

आईला द्यायचं का एक भन्नाट सरप्राईझ ?
सोडा केक किंवा बेकिंग मध्ये वापरतात हे तर तुम्हाला माहीतच आहे पण त्याचे इतरही अनेक उपयोग आहेत. जसंकी कपड्यांचे जुने डाग तुम्ही बेकिंग सोडा वापरून घालवू शकता. वॉशिंग मशिन, फ्रिज आणि मायक्रोवेव्ह आतून बाहेरून स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा वापरता येतो. आईला मदत करताना बेकिंग सोडा पाण्यात कालवा आणि त्याने आईला फ्रिज बाहेरून पुसून सरप्राईज द्या.
तुमच्या सगळ्यात उपयोगाचं आहे ते तेल खडू किंवा क्रेयॉन्स चे डाग घालवण्यासाठी. काय करा.
1) भिंती, कपडे यांच्यावर तेलकट खडूचे डाग पडले आहे का?
2) मग एका वाटीत थोडा बेकिंग सोडा घ्या.
3) त्यात थोडं पाणी घालून त्याची पेस्ट बनवा.
4) कपड्यावर डाग असेल तर कपड्याचा तो भाग गरम पाण्यात घाला.
5) वरुन 1-2 चमचे बेकिंग सोडा टाका.
6) क्रेयॉन्स चटकन कपड्यांपासून सुटून जातात.
7) गरम पाण्यात बेकिंग सोडा घालून स्पंजने भिंती पुसा.
8) क्रेयॉनचा रंग जाण्यास मदत होईल.
9) तुम्ही केलेल्या कच?्याला खूप घाण वास येत असेल तर
त्या कच?्याच्या बादलीत थोडा बेकिंग सोडा घाला. वास गायब होईल.
10) आहेत कि नाही सोप्या युक्ती. आता आईबाबांची बोलणी खावी लागणार नाहीत, काय?