Learn English : इंग्रजीत भाज्यांना नावं ठेवायची का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 17:26 IST2020-04-07T17:16:34+5:302020-04-07T17:26:03+5:30
इंग्रजीशी दोस्ती करणं काही फार मोठं कठीण नाही.

Learn English : इंग्रजीत भाज्यांना नावं ठेवायची का ?
एरवी इंग्रजी म्हणजे मोठा शत्रूच जसा काय तुमचा ! पण ठरवलं तर इंग्रजीशी दोस्ती करणं काही फार मोठं कठीण नाही.
इथे रोज नवा खेळ सुचवायचं ठरवलंय आम्ही. तुम्ही घरात दोन मुलं असा, नाहीतर चार-सहा; हा खेळ खेळण्यात मस्त वेळ तर जाईलच, शिवाय नवेनवे शब्दही समजतील. तर चला, करूया सुरू..
काय करायचं?
1. कुठलाही एक विषय निवडायचा, ज्याच्याशी संबंधित खूपसे शब्द असतील. म्हणजे जसं आजचा शब्द आहे भाज्या! इंग्रजीत Vegetables
2. या विषयाशी संबंधित एक शब्द एकाने सांगायचा; पण तो शब्द इंग्रजी असला पाहिजे.
3. लगेच पुढच्याने दुसरा शब्द सांगायचा.
4. एका गडय़ाला जास्तीत जास्त वेळ 30 सेकंद एवढाच!
तेवढय़ा वेळात जर नवा शब्द आठवला नाही, तर तो/ती बाद ! - करा सुरुवात, बघूया शेवटर्पयत कोण टिकतं आणि जिंकतं ते..