Kids play @ home- लावता का पाणी आणि रॉकेलची रेस ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 19:14 IST2020-04-01T19:08:31+5:302020-04-01T19:14:27+5:30
एक असा सुपरफास्ट गेम कि मज्जाच मज्जा

Kids play @ home- लावता का पाणी आणि रॉकेलची रेस ?
काय म्हणता विश्वास नाही बसत ? हे करून पहा , लावा ही रेस !
साहित्य :
दोन एकाच आकाराचे काचेचे उंच ग्लास. दोन एकाच आकाराच्या काचेच्या लहान गोटय़ा. एक टेबल. 150मि.ली. पाणी. 150 मि.ली. रॉकेल.
तर करा सुरू :
प्रथम टेबलावर दोन ग्लास ठेवा.
ग्लासात अनुक्रम रॉकेल आणि पाणी समान उंचीर्पयत भरा. द्रव ओतल्यानंतर ते स्थिर होऊ द्या. आता दोन मुलांनी एकेक गोटी घेऊन ग्लासामागे थांबायचे. तिसरा मुलाने खूण करताच दोन्ही मुले एकाच वेळी आपल्या हातातली गोटी ग्लासात अलगद सोडतील. जी गोटी सर्वात आधी ग्लासाच्या तळाशी जाईल ती गोटी शर्यत जिंकली.
असं का होतं :
काही द्रवांतील अणूंचे आकर्षण कमी असते. त्यातून वाहताना विरोध कमी होतो. अशा द्रवांना आपण पातळ द्रव म्हणतो. उदा. पाणी आणि रॉकेल. आपल्या शर्यतीचा निकाल पुढीलप्रमाणो :
01 रॉकेल. 02 पाणी.