शाळेशी कट्टी की बट्टी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 06:56 PM2020-05-29T18:56:41+5:302020-05-29T18:57:41+5:30

आज तुम्ही काहीतरी बघणारच, तर काय बघाल?

Kids need recess Simon Link | शाळेशी कट्टी की बट्टी ?

शाळेशी कट्टी की बट्टी ?

Next
ठळक मुद्देलॉक डाऊन काळात जेव्हा तुम्ही शाळेत जात नाहीत अशावेळी आपण आपल्या वेळेचा कसा वापर करतोय हेही मह्त्वाचंच आहे. 

कुठल्याही शाळेतलं सर्वसाधारण चित्र काय असतं, मधली सुट्टी झाली की सगळी मुलं डबे घेऊन वर्गातून धुरराट सुटतात आणि शिक्षक मधली सुट्टी कधी संपतेय आणि मुलं एकदम शिस्तीने परत एकदा वर्गात कधी बसताहेत, याची वाट बघत असतात. 
मधली सुट्टी तुम्हा मुलांसाठी किती किती महत्वाची असते, हे मोठ्यांना कळावं कसं?
पण आता ही गोष्ट एका तिसरीतल्या मुलांनी मोठ्यांना समजावून सांगितली आहे बरका. सिमॉन लिंक या चिमुरड्याने याच विषयावर टेड टॉक मध्ये भाषण दिलं. तो म्हणतो, एकामागेएक खूप खूप वेळ मुलांना शिकवण्यामुळे त्यांच्या डोक्यात काहीच शिरत नाही. मुलांना थोड्या थोड्यावेळाने सुट्टी दिली तर आम्ही मुलं वर्गात काय चाललं आहे याकडे अधिक लक्ष देऊ शकतो. 
सिमॉनचं अगदी बरोबर आहे.  जर मुलांना ब्रेक मिळाले तर त्यांचं अभ्यासाकडे अधिक लक्ष लागेल हे खूप स्वाभाविक आहे. तुम्हाला या चिमुरड्याचा व्हिडीओ बघायचा असेल तर युट्युबवर Kids need recess Simon Link असा सर्च करा. 
त्याचबरोबर अजून एक व्हिडीओ नक्की बघा. हा व्हिडीओ आहे Eddy Zhongg . हाही टेड टॉक व्हिडीओ आहे. एडीचं म्हणणं आहे शाळा मुलांची बुद्धिमत्ता वाढवत नाही तर कमी करते. टीनएजर मुलगा टेक इंत्रप्रेन्युअर आहे. तो म्हणतो, शाळेत गेल्यामुळे विचारांना सीमा येतात, चौकटी उभ्या राहतात. ज्यामुळे मुळं वेगळा विचार करणं बंद करून टाकतात. शाळा खरंच असं काही करतात कि नाही हे वेगळं पण आताच्या लॉक डाऊन काळात जेव्हा तुम्ही शाळेत जात नाहीत अशावेळी आपण आपल्या वेळेचा कसा वापर करतोय हेही मह्त्वाचंच आहे. 
याचाही व्हिडीओ तुम्हाला युट्युबव बघता येईल. 
त्यासाठी सर्च करा:   How School Makes Kids Less Intelligent  Eddy Zhong

Web Title: Kids need recess Simon Link

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.