साहित्य: बीटाचे साल, कांद्याचे साल, पालक, जास्वंदीचे पान, संत्र्याचे साल, पाणी आणि एक छोटं पातेलं. कृती: 1) डाय बनवण्यासाठी भाज्यांची सालं आणि इतर साहित्य गोळा करा. 2) डाय बनवण्यासाठी प्रत्येक गोष्ट किमान 1 कप हवी. 3) प्रत्येक सालीपासून जो तो रंग तुम्ही तयार करू शकता. 4) त्यासाठी सगळ्या गोष्टी बारीक चिरून घ्या. तुम्हाला चिरता येत नसेल तर आईबाबांकडून चिरून घ्या. स्वत: प्रयोग करू नका. 5) आता पातेल्यात एक कुठलाही पदार्थ घ्या. आणि त्यात थोडं पाणी घालून बारीक गॅसवर शिजवा. 6) चांगली उकळी आल्यानंतर गॅस बंद करा आणि ते मिश्रण थंड होऊ द्या. 7) थंड झाल्यावर गाळणीने किंवा कापडाने पाणी गाळून घ्या. तुमचा रंग तयार आहे. 8) वर दिलेल्या प्रत्येक पदाथार्साठी ही क्रिया करा. म्हणजे तुमच्याकडे लाल, हिरवा, पिवळा, ऑरेंज, आणि तुम्हाला हवे ते सगळे रंग तयार होतील. 9) या रंगांना म्हणतात व्हेजिटेबल कलर्स.